शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उजनीतील पाणीसाठा झाला निम्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:43 IST

१५ धरणांतून पाणी सोडले; ३ दिवसांत पावणेपाच टीएमसी पाणी झाले जमा

पुणे : जिल्ह्यातील बहुतांश धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने सोलापूरची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत उजनीत ४.७५ टीएमसी पाणी जमा झाले आहे. शनिवारीदेखील जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १५ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे उजनीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.जिल्ह्यातील माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात ३, डिंभे १, कळमोडी ६, भामा-आसखेड २, वडीवळे २०, आंद्रा २, पवना १९, मुळशी २६, टेमघर ३१, वरसगाव १६, पानशेत १२ आणि खडकवासला धरण क्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी धरण क्षेत्रात ४ आणि नीरा देवघरला २१ मिलिमीटर पाऊस झाला.शनिवारी सकाळी आठपर्यंत पिंपळगाव जोगे २१, माणिकडोह २९, कळमोडी १६, वडीवळे ४६, आंद्रा ११, पवना ४८, मुळशी २७, टेमघर ५८, वरसगाव ३३ आणि पानशेतला ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.धरणक्षेत्रात संततधार सुरु असल्याने खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणातून ६ हजार ७९, पानश्ेत १ हजार ९५४ आणि पुढे खडकवासल्यातून ११ हजार ७६७ क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुठा नदी दुथडी भरून वाहिली. मुळशी ५ हजार, कासारसाई ४००, पवना २ हजार २०८, आंद्रा ५१६, वडीवळे १३७, चासकमान ३ हजार २०, कळमोडी ५९१, डिंभे ५ हजार ३७९ आणि वडज धरणातून ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसीजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसी (५०.६१ टक्के) झाला आहे. उजनीत १६ अ‍ॅगस्ट रोजी सकाळी २२.३७ टीएमसी साठा होता. त्यात शनिवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.७५ टीएमसीची भर पडली. नीरा देवघरमधून ६ हजार ८०८, भाटघर ५ हजार ६४ आणि वीर धरणातून १३ हजार ९९१ क्युसेक्सपाणी नदीत सोडण्यात आले.खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणात १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७ (सर्व शंभर टक्के) आणि टेमधर धरणात २.२४ (६०.३१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.६८ टीएमसी (९४.९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात चारही धरणांत मिळून २४.८३ टीएमसी (८५.१७ टक्के) पाणीसाठा होता.

टॅग्स :PuneपुणेDamधरण