शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:05 IST

इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देपाऊस असाच राहिला तर धरणं लवकरच १०० टक्के भरणार

बाभुळगाव : इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी ९० टक्के भरले असून धरणावर अवलंबून असलेल्या बळीराजाची चिंता मिटल्याचं दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात कोरोना महामारीचं संकट, लाॅकडाऊन, अतिवृृृष्टीचे संकट यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजणी धरण क्षेत्रात पाऊसही कमी झाला होता. त्यामुळं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यास वेळ लागत होता. मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर  अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. 

मागील वर्षी आजच्या दिवशी धरणं पूर्ण क्षमतेनं  भरले होते. तर चालू हंगामात ते ९०.५४ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागत असल्यानं पूर्व भागातील शेतकर्‍यांना यावर्षी पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असताना उजनी धरण क्षेत्रात मात्र पावसाची वाणवा असल्यानं दौंडवरून येणारा पाणी विसर्ग सध्या कमी आहे. पावसाची स्थिती अशीच राहीली तर उजनी यावर्षी पूर्ण  क्षमतेने भरण्याची शक्यता धुसर होणार असुन शेतकर्‍याला मात्र आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता जाणकारातुन व्यक्त करण्यात आली होती.  मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातील पाणी साठा पुन्हा वाढू लागला आहे. असाच पाऊस राहिला तर धरणं १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नाही. यामुळे पुणे जिल्हातील गावांसह सोलापूरचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. 

बुधवार दिनांक २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंतच्या उजनी धरणात ९०.५४ टक्के इतके पाणी आहे. धरणाची पाणी पातळी ४९६.३९५ मीटर इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ४८.५० टीएमसी इतका आहे. तर उजनी धरणातील सिना - माढा बोगदा २२२ क्युसेस व दहिगाव एल आय एस फाटा ६३ क्युसेसने विसर्ग सुरू असून सध्या उजनीतून २८५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. तर उप कॅनल व मुख्य कॅनलमधून पाणी विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीDamधरणRainपाऊस