शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

वापर संपला की BJP त्यांना सोडते, टिळक कुटुंब आणि गिरीश बापटांसोबत तेच घडलं- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 20:49 IST

आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवणं पाशवी....

पुणे : भाजप लोकांचा उपयोग संपला की त्यांना सोडून देते. एखाद्याचा वापर संपला की त्याला किंमत त्या पक्षाकडून मिळत नाही. भाजपने टिळक कुटुंबियांवर अन्याय केला. त्यांचा फक्त वापर करून घेतलाय. पुण्यात गिरीश बापटांबद्दल तेच झालं आहे. बापटांचा वापर करून भाजपने त्यांना सोडले. ते आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवणं पाशवी आहे. याबद्दल भाजपने विचार करायला हवा होता, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. ते चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑनलाईन प्रचारसभा घेतली. 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, टिळक कुटूंबियाचा वापर करून भाजपने त्यांना फेकून दिलं आहे. बापटांना आजारी असतानाही प्रचारात उतरवलं. त्यांचे डबल इंजिन नुसतं धूर सोडतंय. आमच्या सोबत राहिले तर तांदळातले खडे आणि तुमच्यासोबत गेले तर धुतलेल्या तांदळासारखे? असा सवालही ठाकरे यांनी विचारला. धनुष्यबान चिन्ह, शिवसेना हे नाव चोरलं, याला लोकशाही मानत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभा घेत महाविकास आघाडीचा प्रचार केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाgirish bapatगिरीष बापटchinchwad-acचिंचवडkasba-peth-acकसबा पेठ