शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:37 IST

लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते.

पुणे: लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. याच वक्तव्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजितदादांनी उदयनराजेंच्या भूमिकेला एकाच वाक्यात आणि आपल्या खास शैलीत टिप्पणी केली. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर अजित पवारांना पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केले आहे यासंबंधी विचारले. पवार यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना? असा प्रश्न उपस्थित केला. आणि दुसरीकडे असं बोलणारेही लोकप्रतिनिधीचं आहेत ना अशा शब्दात उदयनराजेंना चिमटा काढला. आता यावर उदयनराजे नेमकं काय बोलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सरकार न आल्यामुळे अजूनही विरोधकांच्या पोटात दुखतंय: अजित पवारमराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. विरोधकांचं सरकार न आल्यामुळे अजूनही त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय अशा शब्दात विरोधकांवर निशाणा साधला. 

एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी... अयोध्येत राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर पवार म्हणाले, जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षण