शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:19 IST

कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले.

चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने ओव्हरटेक करताना दुचाकीस जोराचा धक्का दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या बिरदवडी (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली.

सुजय दिलीप कडूसकर (वय १७) आणि सोहम उल्हास कडूसकर (वय १७, दोघे रा. कोरेगाव बुद्रुक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. योगेश विष्णू कड (३५, रा. किवळे, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वसुदेव मायकर (३०, रा. साळींबा, ता. वडवणी, जि. बीड) या कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर हे दोघे एमएससीआयटीच्या क्लासला दुचाकीने (क्र. एमएच १४ जी एक्स ५८६०) जात होते. बिरदवडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती येथे कंटेनरचालक गणेश मायकरने (क्र. एमएच ४५ एएफ ००५४) भरधाव वेगाने दुचाकीस ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील सुजय आणि सोहम यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये सुजय आणि सोहम हे दोघे कंटेनरच्या चाकाखाली आले.

दोघांनाही चाकात अडकलेल्या अवस्थेत कंटेनरने वेगात पंधरा ते वीस फूट फरफटत नेले. फिर्यादी योगेश कड यांनी कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. जखमींना त्वरित चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचाराअगोदरच डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात