शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Pune: बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:46 IST

पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील फनटाईम थिएटरच्या पाठीमागील कॅनॉल रस्त्यावर दोन तरुण पिस्टल घेऊन थांबले आहेत...

धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व ३ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी दिपक ऊर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय-२६ वर्षे रा.मु.पो. रांझे ता मोर जि.पुणे व हर्षद दिलीप चव्हाण (वय २२: वर्षे सध्या रा. मु. पो. ढाकाळी पणदरे ता. बारामती जि.पुणे , मुळ पत्ता मु.पो संभाजी चौक खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.  

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील फनटाईम थिएटरच्या पाठीमागील कॅनॉल रस्त्यावर दोन तरुण पिस्टल घेऊन थांबले आहेत. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन संशयतरित्या फिरणाऱ्या दोघांची चौकशी केली असता ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दिपक जगताप याच्या कंबरेच्या डाव्या बाजुस एक ४० हजार रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टच्या डावे खिश्यात सहाशे रुपये किंमतीचे दोन  जिवंत काडतुसे मिळुन आली. तसेच हर्षद चव्हाण यांच्या पॅन्टच्या डाव्या बाजुच्या कंबरेस एक तीस हजार रुपये किंमतीचे पिस्टल व उजव्या खिशात तीनशे रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस मिळुन आले. असा एकुण ७० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपी दिपक ऊर्फ भैय्याजी धनाजी जगताप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एकुण ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड