शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पुण्यात सेक्सटॉर्शनचे दोन तरुण शिकार; उचलली टोकाची पाऊले

By विवेक भुसे | Updated: October 13, 2022 15:53 IST

पुण्यातील धनकवडी आणि दत्तवाडी धक्कादायक दोन घटना घडल्या आहेत

पुणे: सोशल मीडियावर मुलींच्या नावाने चॅटीग करुन तरुण मुलांना जाळ्यात ओढायचे. त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलिंग करुन त्यांना अर्धनग्न होण्यास सांगून त्याचे स्क्रीन शॉट काढून ब्लॅकमेक करायचे असे प्रकार वाढले आहेत. या त्रासाला कंटाळून दत्तवाडी भागातील युवकाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनकवडी आणि दत्तवाडी येथे अशा दोन घटना घडल्या आहेत. शंतनू (वय १९) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याच्या भावाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दत्तवाडीमधील एका सोसायटीत २८ सप्टेबर रोजी दुपारी घडला होता. अशीच एक घटना धनकवडीमध्ये ३० सप्टेबर रोजी घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ इंस्टाग्राम आयडीवरुन एका अनोळखी प्रित यादव नावाच्या आयडीवर चॅटींग करीत होता. त्यांच्या भावाचे अर्ध नग्न फोटो तिने पाठविण्यास सांगितले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून १ हजार ९०० रुपये, १ हजार ६०० रुपये आणि १ हजार रुपये असे ४ हजार ५०० रुपये फोन पे वरुन घेतले होते. त्यानंतरही धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच त्याचे फोटो व्हायरल केल्याने शंतनू याने २८ सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी अंत्यसंस्कार व सर्व विधी केल्यानंतर बुधवारी याबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने धनकवडी येथील एका तरुणाने ३० सप्टेबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अमोल यानेही या तरुणीच्या धमकावणीनंतर तिला साडेचार हजार रुपये पाठविले होते. तिच्या सततच्या त्रासामुळे अमोल याने तिला ‘‘मै सुसाईड क रहा हू’’ असा संदेश पाठविला होता. त्यावर तिने ‘‘करो सुसाईड मै सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल कर रही हू ’’अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सेक्स टॉर्शन चा हा प्रकार वाढत असून त्याला अनेक तरुण बळी पडत आहेत. मात्र, बदनामीच्या भितीने कोणी सांगत नाहीत. त्याचा कडेलोट झाल्यानंतर प्रकार समोर आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू