शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
2
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
3
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
4
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
5
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
6
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
7
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
8
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
9
Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला
10
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
11
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
12
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
13
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
14
तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'
15
Nirjala Ekadashi 2024: आजच्या दिवशी न जेवताच पोटावरून हात फिरवत भीमाचे घ्या नाव; जाणून घ्या कारण!
16
"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर
17
Trent Boult चा क्रिकेटला रामराम! न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भावूक
18
पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली
19
Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!
20
Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

पुण्यातील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:28 PM

कात्रज बोगद्यापुढे वेळू येथील एका कंपनीमध्ये बुधवारी (14 ऑगस्ट) बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

पुणे : खेड शिवापूर येथील परिसरातील वेळू (ता.भोर) येथे सि पी एच मॅन्युफॅक्चरिंग पीएलएल या अनधिकृत कंपनीला सुमारे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागून त्यामधील बॉयलरचा स्फोट होऊन दोन जण जागीच ठार झाले. स्फोट एवढा भयंकर होता की, दोन कामगार अडीचशे फूट उंच व चारशे फूट लांब उडून पडले होते व या स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटर लांब असलेल्या नागरिकांना ऐकू आला. या अपघातात मनेजर प्रसाद राजंदर प्रसाद (वय २७) रा.बडली, नयनिजोर, जि.बकसर,बिहार व विकास सिंग (वय ३५) इलाहाबाद, उत्तरप्रदेश ) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी वेळू (ता.भोर) येथील ग्रामपंचायतने कंपनीला ही कंपनी अनधिकृत असल्याने नोटिसेद्वारे कळवून बंद करण्यास सांगितले होते, परंतु, रात्री अपरात्री ही कंपनी चोरी छुपे सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजून पंचेचाळीस वाजले असता स्फोट झालेला परिसरातील नागरिकांना आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आग लागल्याचे दिसले. दोन कामागरांपैकी एक जण कंपनीच्या अडीचशे फूट उंच उडून सुमारे चारशे ते पाचशे फूट लांब वर पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याठिकाणी अशा बऱ्याच वेळा घटना घडत आहेत परंतु यावर ग्रामपंचायत काही ठोस भूमिका घेत नाही हे या घटनेवरून समजत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी शिंदेवाडी (ता.भोर ) याठिकाणी २० मार्च २०१९ रोजी क्लासिक कोच बिल्डर्स या कंपनीला आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यानंतर संबधित प्रशासनाने कोणतीच उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही हे या घटनेवरून समजत आहे. घटना घडल्यानंतर लागलीच राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, संतोष तोडकर, संतोष कालेकर, अंबादास बुरटे, बाप्पू कदम, हे पोलीस पथक व भोरच्या प्रभारी तहसीलदार मृदुला मोरे, मंडलाधिकारी विद्या गायकवाड, ग्रामसेवक रेखा आर. रणनवरे, माजी जि. प.सदस्य कुलदीप कोंडे, भोर चे माजी उपसभापती अमोल पांगारे, हिरामण पांगारे, आदी उपस्थित होते
टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू