शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

पेटवून दिलेल्या दोन्ही विवाहितांची मृत्यूशी झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 3:03 AM

आंबेगाव तालुक्यात नवऱ्याने पेटवून दिलेल्या दोन विवाहितांची या आठवड्यात मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आंबेगाव तालुक्यात नवऱ्याने पेटवून दिलेल्या दोन विवाहितांची या आठवड्यात मृत्यूशी झुंज अपयशी ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका घटनेत माहेरी निघालेल्या पत्नीला नवरा व सासूने पेटवून दिले, तर दुसºया घटनेत मुलाला भांडी घासायला का लावले, अशी नव-याला विचारणा केल्याने त्या पत्नीला पेटवून दिले. एकीचा तीन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या दोन्ही घटना हृदय पिळवटून टाकणा-या घटना घडल्या.माहेरी निघाल्याने नवरा, सासूने दिले होते पेटवूनमंचर  - गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे सासू व पतीने रॉकेल ओतून पेटवून दिलेल्या विवाहितेचा उपचारानंतर तीन महिन्यांनी मृत्यू झाला आहे. सोनाली रामदास गावडे (वय २८) असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेचा पती रामदास गावडे यास पोलिसांनी अटक केली असून सासू भारती पंढरीनाथ गावडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे.आईची तब्येत बिघडली आहे. मी माहेरी जाऊन येते, असे विवाहितेने म्हटल्यावर नवरा व सासुने भांडण करीत स्टोव्हमधील रॉकेल अंगावर ओतून तिला पेटवून दिले होते.पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे म्हणाले, ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता सोनाली गावडे हिला आई सरस्वती महादेव पवार हिचा फोन आला. माझी तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तू मला भेटायला ये, असे सांगितल्याने सोनाली हिने नवरा रामदास गावडे याला पौर्णिमा आहे. पुनवेचा स्वयंपाक पहाटे करून मी आईला भेटायला जाते, असे सांगितले. त्यावेळी नवरा रामदास आणि त्याची आई भारती यांनी माहेरी कशी जाते, असा दम सोनालीला दिला. त्यानंतर दुसºया दिवशी पहाटे उठून सोनालीने पौर्णिमेचा स्वयंपाक केला. सकाळी ८ वाजता नवरा रामदास गावडे यांना स्वयंपाक झाला आहे. मी माहेरी जाऊन येते, असे सोनालीने सांगितले. त्यावेळी तिची सासू भारती हिने माहेरी नेहमी जाते. तुझ्या बापाने आम्हाला १० तोळे सोने दिले आहे का, असे म्हणून भांडण करून सोनालीचा नवरा रामदास यांस त्याची आई भारती हिने हिला मारून जाळून टाक, हिचे आपल्याला करायचे काय, असे म्हटल्यावर सोनालीचा नवरा रामदास याने स्टोव्हचे झाकण काढून स्टोव्हमधील रॉकेल सोनालीच्या अंगावर ओतले.पेटती काडी तिच्या अंगावर टाकून सोनालीला पेटवून दिल्यानंतर नवरा रामदास याने तेथून पळ काढला. त्यानंतर भाजलेल्या अवस्थेत सोनाली हिस मंचर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी तिचा नवरा, सासू यांनी ही घटना कोणाला सांगितली तर तुला व तुझा मुलगा कौस्तुभ यास ठार मारू, अशी धमकी सोनालीला दिली. मंचर येथे वैद्यकीय उपचार करून पुढील उपचारासाठी सोनाली हिस पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोलिसांना सोनालीने मृत्यूपूर्व जबाब दिला. त्यामध्ये मला जाळून टाकण्याचा प्रयत्न नवरा आणि सासूने केला असल्याचे म्हटले आहे.-उपचार सुरू असताना तीन महिन्यानंतर सोनालीचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूपूर्व जबाबावरून मयत सोनालीचा नवरा रामदास पंढरीनाथ गावडे, सासू भारती पंढरीनाथ गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा मंचर पोलिसांनी दाखल केला. याप्रकरणी रामदास गावडे याला अटक झाली आहे. सासू भारती गावडे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला आहे.मुलाबद्दल जाब विचारल्याने अंगावर ओतले रॉकेलमंचर - ६ वर्षांच्या मुलाला भांडी कशाला घासायला लावता, तो काय मुलगी आहे का, असे विचारणा-या विवाहितेला पतीने पेटवून दिले. ही घटना पोंदेवाडी-रोडेवाडी (ता. आंबेगाव) येथे घडली. विवाहिता नयना ऊर्फ शीतल गावडे (वय ३०) हिस नवरा भरत गावडे याने रागाच्या भरात भांडण करून पेटून दिल्याने तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे भाजलेल्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जात असताना पतीने तिला लहान मुलासह रस्त्यात सोडून पोबारा केला. आजुबाजुच्या नागरिकांनी तिला उपचारासाठी मंचरला आणले. विवाहितेचा पती भरत गावडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून फरार नवºयाचा पोलीस शोध घेत आहेत.पोंदेवाडी-रोडेवाडी फाटा येथे वायाळ यांची शेती आहे. तेथे गावडेवाडी येथील शेतमजूर म्हणून भरत गावडे, पत्नी नयना गावडे काम करतात. परिसरातच ते राहत आहे. त्यांना ६ वर्षांचा आर्यन हा मुलगा आहे. २६ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचला नयना, तिचा पती भरत हे उठले. घरातील कामे नयना करत होती. घरातील स्वयंपाक करून सकाळी साडेनऊला सर्वांनी एकत्र जेवण करून एका शेतकºयांचा शेतावर डाळिंब तोडण्यासाठी पती-पत्नी आणि मुलगा हे सर्वजण गेले. सायंकाळी ६ वाजता घरी आले. त्यावेळी भरतने त्याचा मुलगा आर्यन यास घरातील भांडी घासण्यासाठी सांगितले. त्यावेळी नयना हिने तो मुलगी आहे का? तुम्ही त्यास भांडी घासायला सांगता, असे म्हटले त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भरतने पत्नी नयना हिस शिवीगाळ केली. शिव्या का देता, असे म्हटल्यावर बाटलीतील रॉकेल पत्नी नयनाच्या अंगावर रागाच्या भरात ओतून पेटवून दिले.नयना आरडाओरडा करत बाहेर धावली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाºया नागरिकांनी पाणी आणि माती टाकून विझवले. त्यानंतर नयना,आर्यन यांना मोटारसायकलवर घेऊन पती भरत याने वैद्यकीय उपचारासाठी मंचरकडे निघाला. मात्र रस्त्यातच सोडून पळून गेला.एका वाहनचालकाने मंचर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठीससून रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले. त्यावेळी पोलिसांनी नयना हिचा मृत्यूपूर्वी जबाब घेतला असता नयना हिने नवरा भरतने मला पेटवून दिल्याचे सांगितले. शुक्रवारी वैद्यकीय उपचार चालू असताना नयनाचा मृत्यु झाला.- कहर म्हणजे रोडेवाडी फाटायेथे गंभीर जखमी अवस्थेत भाजलेल्या नयना आणि मुलगा आर्यन यास भरतने रस्त्यावर सोडले तेथुन त्याने धुम ठोकली. ६० टक्के भाजलेल्या नयनाने मदतीसाठी हाक मारली. तेथुन जाणाºया एका वाहनचालकाने तिला मदत करत मंचर उपजिल्हा रुग्णालयात नयना हिस वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिलाDeathमृत्यू