शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेलपिंपळगावला पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून; गुरुवारी रात्री सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 16:01 IST

स्थानिक नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये असे सुचवले असतानाही दुचाकीस्वाराने रात्रीच्या वेळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातली...

शेलपिंपळगाव : चाकण -शिक्रापूर हायवे रस्त्यावरील शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथील ओढ्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली. संबंधित घटनेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे गुरुवारी (दि.१५) उशिरा उघड झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेतला आहे.

जनार्दन मारुती डिंबर (वय ४७ मूळगाव रामदासनगर चिखली ता. हवेली) असे संबंधित मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील मोहितेवाडी परिसरातील शिवकृपा पेट्रोल पंपाशेजारील ओढ्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना संबंधित दुचाकीस्वार गुरूवारी रात्री पावणे एकच्या सुमारास ओढा ओलांडून पुढे प्रवास करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीसह (एमएच १४ एचएस ५६५५) वाहून गेला.         विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी संबंधीत व्यक्तीस पुराच्या पाण्यात जाऊ नये असे सुचवले असतानाही स्थानिकांचे न ऐकता डिंबर यांनी पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातली. मात्र पुराचा जोर मोठा असल्याने काही क्षणातच डिंबर मोटारसायकलसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटनास्थळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता घटनेपासून दोन किलोमीटरवर अंतरावर दुचाकी सापडलो. तर गुरुवारी उशिरा मृतदेह आढळून आला.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरDeathमृत्यूRainपाऊसtwo wheelerटू व्हीलर