महाळुंगे : खोपोली, रायगड येथुन रांजणगाव अैाद्योगिक वसाहतीत एका कंपनीतून पामतेल घेवुन जाणाऱ्या टँकर चालकाने किराना दुकानदाराच्या सांगण्यावरून टँकरचे सिल पकडीने तोडुन टँकर मधील पामतेल चोरी करत असताना महाळुंगे पोलिसांनी रंगेहात पकडले.
ही घटना शुक्रवारी (दि ८) रात्री ११.३० च्या सुमारास निघाजे (ता.खेड) येथे महींद्रा कंपनीच्या गेट समोर घडली. या प्रकरणी. टँकर चालक अशिषकुमार सुरेश शर्मा, व किरानामाल चालक राजु रचाराम चौधरी (भोसरी)या दोघांना अटक करण्यात आली आहे. शर्मा हा पामतेलाचा टँकर घेऊन खोपोलीतून रांजणगाव अैाद्योगिक वसाहतीत जात होता. टँकर तळेगाव - चाकण मार्गे रांजणगाव येथे न नेता आडमार्गे तळेगाव येथुन निघोजे गावचे हद्दीतील महींद्रा कंपणीच्या समोर महाळुंगे रस्त्यावर अंधारात थांबवला. टँकरचे सील ताेडून पामतेल ची चाेरी करत असतांना पोलिसांनी टँकर चालक व दुकान मालकाला रंगेहात पकडले.
फोटो :