शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र आळंदीत प्रशासनाचा आदेश झुगारून हद्दीबाहेरील दोन विवाह सोहळे ; दोन कार्यालय चालकांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 12:29 IST

आळंदी बाहेरील हजारो वऱ्हाडी मंडळी शहरात येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण

ठळक मुद्देआळंदीत कोरोनाची धास्ती न घेता पैसे कमविण्यासाठी अनेकजण घेत आहेत लग्नाच्या ऑर्डर

आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाने यापूर्वी तशा सूचनाही दिल्या आहेत. मात्र शहरात रविवारी (दि.२४) दोन वेगवेगळ्या विवाह कार्यालयात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत हद्दीबाहेरील लग्न सोहळे पार पडले. याप्रकरणी दोन विवाह मंगल कार्यालय चालकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.       मागील दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर मज्जाव घालण्यात आला आहे. दरम्यान लग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीतील मंगल कार्यालये, धर्मशाळा व हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जाऊ लागले. परिणामी आळंदी बाहेरील हजारो वऱ्हाडी मंडळी शहरात येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली.     यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून थेट प्रांताधिकारी संजय तेली यांनी शहराबाहेरील नागरिकांना शहरात विवाह सोहळा आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश जारी केला. स्थानिक नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील मंगल कार्यालये व धर्मशाळा व्यवस्थापकांना लेखी सूचना दिल्या. परंतु कार्यालय चालकांना सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येत आहे.................आळंदी शहरालगत असलेल्या मोशी, चऱ्होली दिघी आदी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तरीसुद्धा आळंदीत कोरोनाची धास्ती न घेता अनेकजण पैसे कमविण्यासाठी लग्नाच्या ऑर्डर घेत आहेत. शहरातील विविध मंगल कार्यालये, धर्मशाळा आणि घरातही लग्न कार्ये आयोजित करून पार पाडली जात आहेत. मात्र यांमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Alandiआळंदीmarriageलग्नPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस