शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:56 IST

भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात.

ठळक मुद्दे सतरा विद्यार्थी किरकोळ जखमी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस सुस्थितीत असणे आवश्यक

कात्रज : विद्यार्थी घेण्यासाठी कात्रज चौकात थांबलेल्या पीएमपी बसच्या मागचे दोन टायर फुटल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत १७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. पीएमपी बसच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दैैवबलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. मात्र, पीएमच्या बसच्या सुरक्षितेतवर पुन्हा एकदा या घटनेने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.         भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात. अशाच विद्यार्थ्याँना घेवून जाणारी बस कात्रज येथे बस थांबली असताना अचानक मोठा आवाज आला. बसला धुळीने घेरले. मोठ्या आवाजामुळे बसकडे धावलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांना बस बाहेर काढले. बसच्या मागचे दोन टायर एकाचवेळी फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना हाताला, पायाला, डोक्याला, कमरेला मुका मार लागला होता. अशा सर्वांची आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर  विद्यार्थ्याँना घरी सोडण्यात आले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दुर्घटना टळली असली तरी याचा पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निवेदन महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी पीएमपी आगाराला दिले आहे.-------------------------------------------

टॅग्स :katrajकात्रजPMPMLपीएमपीएमएलStudentविद्यार्थीSchoolशाळाNayana Gundeनयना गुंडे