शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणमध्ये रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:18 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाची कामगिरी, ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्दे सदरच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना फक्त गाडी आणि आरोपी यांच्या वर्णनावरून माहिती गोळा करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणी काळभोर: भिगवणमध्ये रस्त्यात अडवून धमकी देत लूटमार करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनाथ बबन शिंदे ( वय ३०, रा.लोणी काळभोर) व लखन रमेश झेंडे ( वय २५, रा. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण पोलीस ठाण्याचा हद्दीत अनराज महंमद अन्सारी हे बेकरी व्यावसायिक माल घेऊन चालले होते. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद हॉटेलजवळ आरोपींनी आपली दुचाकी त्यांच्या गाडीसमोर आडवी घातली. त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत 'तुझा मोबाईल व तुझ्याकडील पैसे दे नाही तर तुला सोडणार नाही' असे म्हणून अन्सारी यांचा मोबाईल घेऊन पळून गेले . 

सदरच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना फक्त गाडी आणि आरोपी यांच्या वर्णनावरून माहिती गोळा करण्यात आली. पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत लाल रंगाच्या दुचाकी वरून दोघे आरोपी थेऊर फाटा येथे एका हॉटेल जवळ थांबल्याचे कळाले. यावरून  त्याठिकाणी जाऊन सदरील गाडी वापरत असलेल्या नवनाथ शिंदे व लखन झेंडे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल आणि  स्कुटी असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोघांना मुद्देमालासह पुढील तपासासाठी भिगवण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी