‘होम नीड्स’च्या नावाखाली जेजुरीकरांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना तामिळनाडूतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:33 IST2017-12-27T13:29:02+5:302017-12-27T13:33:24+5:30

जेजुरी येथे उदयन होम नीड्सच्या नावाखाली ८ ते १० लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना जेजुरी पोलिसांनी तमिळनाडू येथील त्यांच्या गावी जाऊन शिताफीने अटक केली आहे. 

two thief arrested from tamilnadu who cheat jejuri citizen | ‘होम नीड्स’च्या नावाखाली जेजुरीकरांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना तामिळनाडूतून अटक

‘होम नीड्स’च्या नावाखाली जेजुरीकरांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना तामिळनाडूतून अटक

ठळक मुद्देसासवड न्यायालयाने आरोपीना सुनावली ४ दिवसांची पोलीस कोठडीसुमारे १३० जणांना या भामट्यांनी लुबाडले, एकूण ८ ते १० लाखांना गंडा

जेजुरी : गेल्या महिन्यात जिल्ह्यातील जेजुरी येथे उदयन होम नीड्सच्या नावाखाली निम्म्या किमतीत घरगुती वापराच्या व चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून ८ ते १० लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना जेजुरी पोलिसांनी तमिळनाडू येथील त्यांच्या गावी जाऊन शिताफीने अटक केली आहे. 
उदयकुमार छलय्या (वय ४४, रा. कलतुर, इल्लगुडी, जि. शिवगंगा) व नागराजन छिन्नाकन्नू (वय ५९, रा. आलगुडी, जि. पुद्दुकोट्टा) या दोघांवर तब्बल तीन दिवस वेशांतर करीत पाळत ठेवून शिताफीने त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना जेजुरी येथे सासवड न्यायालयात हजर केले असता कोर्टाने आरोपीना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नोव्हेंबरमध्ये लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीपैकी दोघांना जेजुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुमारे १३० जणांना या भामट्यांनी लुबाडले होते. त्यानुसार जेजुरी पोलीस गेले महिनाभर यांच्या मागावर होते. आज यातील दोघांना अटक केली आहे. त्यांचे अजूनही काही साथीदार आहेत, तसेच अजूनही अनेकांना या भामट्यांनी लुबाडल्याचे समजते आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे जेजुरी पोलिसांनी सांगितले.

Read in English

Web Title: two thief arrested from tamilnadu who cheat jejuri citizen