पुणे : मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार महाविद्याालयीन विद्यार्थी आणि त्याचा मित्र मृत्यूमुखी पडल्याची घटना भूगाव रस्त्यावर मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थी आणि त्याचा मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुणाल शर्मा (वय १८,रा. विमाननगर), मानस उपाध्याय (वय १८, रा. न्याती एम्पायर, खराडी) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.अपघातात ध्रुव बिष्णोई, शुभम मदार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरनाथ सिंग राजेश सिंग (वय १८,रा. खराडी, मुंढवा रस्ता) याने यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय जमदाडे (वय २५, रा. शिंदे पेट्रोल पंपानजीक, बावधन) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानस, कुणाल, ध्रुव , शुभम आणि अमरनाथ सिंग हे मित्र आहेत. ते पुण्यात शिक्षणासाठी आले असून एका शैक्षणिक संस्थेत ते शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ २ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघाले होते. मानस, कुणाल, ध्रुव, शुभम आणि अमरनाथ सिंग वेगवेगळ्या दुचाकीवरुन निघाले होते. भूगाव रस्त्यावर हॉटेल वुडस् समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मानस, कुणाल, धुव्र, मानस यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी मानस आणि कुणालचा मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे तपास करत आहेत.
मोटारीच्या धडकेने दोन महाविद्याालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोटारचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 19:56 IST
शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ २ या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघाले होते. हॉटेल वुडस् समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली.
मोटारीच्या धडकेने दोन महाविद्याालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, मोटारचालकास अटक
ठळक मुद्देयाप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय जमदाडे याला अटक