शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधील दोन पोलिसांना लाच घेताना पुण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 21:32 IST

राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बहिणीला सहआरोपी करु नये, यासाठी पुण्यात ५०हजार रुपयांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजस्थानमधील दोघा पोलिसांना अटक केली आहे.

पुणे : राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बहिणीला सहआरोपी करु नये, यासाठी पुण्यात ५०हजार रुपयांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजस्थानमधील दोघा पोलिसांना अटक केली आहे़     सहायक पोलीस उपनिरीक्षक रामलाल छगनलालजी गुर्जर (वय ५६), पोलीस शिपाई प्रेमसिंग धरमसिंग जाटव (वय २६, दोघे रा़ आंबामाता पोलीस ठाणे, उदयपूर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांचे मेव्हणे (बहिणीचे पती) यांच्याविरुद्ध आंबामाता पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे़ या गुन्ह्याच्या तपासासाठी रामलाल गुर्जर व प्रेमसिंग जाटव हे पुण्यात आले होते़ त्यांनी तक्रारदारांच्या मेव्हण्याचा पुण्यात शोध घेतला पण ते सापडले नाही़ त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून या गुन्ह्यात तुमच्या बहिणीलाही सहआरोपी न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली़.     लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यावर रविवारी त्याची पडताळणी करण्यात आली़ ३ लाख रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर पुणे स्टेशन येथील शिवम येथे सापळा रचला़ तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये घेताना दोघांना पकडण्यात आले़ बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय सेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप चव्हाण यांनी केले आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाRajasthanराजस्थानPoliceपोलिस