पुणे- मुंबई महामार्गावर दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 10:53 IST2023-11-22T10:53:01+5:302023-11-22T10:53:16+5:30
जुना पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती- शक्ती चौकाजवळ सोमवारी (दि. २०) सायंकाळी पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली...

पुणे- मुंबई महामार्गावर दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; तरुणास अटक
पिंपरी : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. जुना पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती- शक्ती चौकाजवळ सोमवारी (दि. २०) सायंकाळी पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली.
निखिल दिलीप भागवत (३०, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार शुभम कदम यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती- शक्ती चौकाच्या पुढे एका हॉटेलजवळ एक जण संशयितरीत्या आला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून निखिल भागवत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपयांची चार जिवंत काडतुसे आढळून आली, असे फिर्यादीत नमूद आहे.