व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:25+5:302021-06-26T04:09:25+5:30

पुणे : ‘पचास लाख रुपये दे, नहीं तो ठोक दूंगा, कल तक पैसे रेडी रखना, मैं जो बोल रहा ...

Two persons who demanded a ransom of Rs 50 lakh from a businessman were caught red handed | व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

पुणे : ‘पचास लाख रुपये दे, नहीं तो ठोक दूंगा, कल तक पैसे रेडी रखना, मैं जो बोल रहा हूं वह सुननेका, पैसे का इंतजाम रखनेका, पोलीस को पता लगा तो अंजाम जानता है, तेरा खानदान तो पुरा गया...अशा शब्दांत एका अनोळखी फोनवरून मोठ्या व्यावसायिकाला धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. रक्कम देण्यासाठी आरोपींनी व्यावसायिकाला औंध येथे बोलावले आणि रक्कम स्वीकारताना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले. त्यातील एक व्यावसायिकाकडे पूर्वी चालक म्हणून काम करीत होता आणि त्याने २०१६ मध्ये काम सोडले असल्याचे समोर आले आहे.

अजुहरददीन शेख (वय २४, रा. शाहूनगर चिंचवड, मूळ पश्चिम बंगाल) आणि संतोष देवकर (वय ३२, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांची कंपनी आणि बांधकामाचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात (दि.१६) त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि त्यांच्याकडे ५० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तक्रारदारांनी तत्काळ खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेतली. याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता. आरोपींनी पुन्हा फोन करून त्यांना रक्कम कुठे आणून द्यायची याची जागा सांगितली. औंध येथे त्यांना पैसे आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि अजुहरददीन शेख याला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळुखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर आणि रूपाली कर्णवर या पथकाने केली आहे.

-------

स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी आरोपीने रचला कट

संतोष देवकर हा पूर्वी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या सांगण्यावरून अजुहरददीन शेख याने व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये शोध घेऊन त्यालाही पकडले. व्यावसायिकाने संतोष यास वेळोवेळी आर्थिक मदत केलेली होती. त्यांची आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेत स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

-------------------------

Web Title: Two persons who demanded a ransom of Rs 50 lakh from a businessman were caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.