शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चिलीम ओढण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना अटक, संगमघाट येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:59 IST

बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत केली दोघांना अटक

ठळक मुद्देलॉक डाऊननंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खुन

पुणे : संगमघाट येथील पार्किंग मध्ये झोपलेल्या एका तरुणाच्या डोक्यात वार करुन खुन करण्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत दोघांना अटक केली. तर त्यांचा अन्य एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निखील उर्फ भैय्या दिगंबर कांबळे व प्रदिप उर्फ गोट्या गोरख कटारनवरे, (वय-25, राहणार दोघेही ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगेश विष्णु कांबळे (29,रा.मंगळवार पेठ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सुरवातीला अज्ञात वेक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लॉक डाऊननंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा खुन आहे. चिलीम ओढण्याच्या कारणातून झालेल्या वादातून खून झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांकडे चौकशी करुन प्रथम मृतदेहाची ओळख पटविली तेव्हा त्याचे नाव मंगेश विष्णू कांबळे, रा. मंगळवारपेठ) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगेशच्या आई व भाऊ यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मंगेश नशापाणी करीत असल्याने आमच्याबरोबर राहत नव्हता. तो कोणतेही काम करुन कोठेही राहत असे. त्याचा राहण्याचा एक ठावठिकाणा नव्हता. दरम्यान संगम घाटावर नशापाणी करणारे व फिरस्ते यांच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता मंगेशची मंगळवारी घाटावर दोघा तिघा बरोबर भांडण झाल्याचे समजले. त्यानुसार त्यातील एक व्यक्ती ताडीवाला रोड भागातील नदीकिनारी असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला तेव्हा दोघांनी खून केल्याची कबुली दिली. आणखी त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, कर्मचारी निखिल जाधव, गौरव उभे, सागर जगताप, अय्याज दड्डीकर, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, किरण तळेकर, हरीष मोरे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक