शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोघीही गरोदर

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 9, 2024 19:57 IST

मुली गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या दोन वेगवगेळ्या घटना घडल्या आहेत. यातून पीडित मुली गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या प्रकरणात, १७ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. ८) कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एकावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने पीडितेला त्याच्या घरात बोलवून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सूळ करत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात, सिंहगडरोड परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिचे राहते घरी येऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसMolestationविनयभंग