शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एटीएम कार्ड क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना नाशिकमधून अटक; २५० तक्रारी होत्या आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 20:28 IST

पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.

पुणे : एटीएम कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डद्वारे पैसे काढणार्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. पुण्यातील लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करुन नाशिकमधील एटीएम सेंटरमधून १ लाख रुपये काढण्यात आले होते.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७) , मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय ३७, दोघे रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मोहम्मद फैजन फारुख छत्रीवाला याने त्याच्या साथीदारासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो मागील ३ वर्षापासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार आहे. हा गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे २ वर्षे दुबई मध्ये पळून गेला. तो डिसेंबर २०१९ मध्ये भारतात परतला होता.

पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. यादृष्टीने पोलिसांनी तपास करत दोघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरा, २ वॉकी टॉकी, चार्जर, हेडफोन, १५ मायक्रो बॅटरी आणि त्याचे मॅकनिझम, ५० डाटा केबल, ४ लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, ११ सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, ११ स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, ४ इलेक्ट्रॉनिक सर्किट, ९ सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्याकरिता लागणारा कलर प्रिंटर असा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डेनिस मायकल (वय ३२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. मायकल यांच्या खात्यातून ३० नोव्हेंबर २० रोजी नाशिक येथील एटीएम सेंटर वरून १० ट्रानझाक्शन करून १ लाख रुपये काढण्यात आले. याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अशाप्रकारचे 2२०० ते २२५ गुन्हे पोलिसांकडे आल्याने त्याबाबत तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला असता ते नाशिक येथे असल्याचे समजले.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ यांचे पथक नाशिकला जाऊन त्यांनी आरोपी ताब्यात घेतले. सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे, संदेश कर्णे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, नितीन चांदणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

.........

नायजेरियन आरोपी गजाआडपुण्यातील हडपसर भागात सातवनगर येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मध्ये स्कीमर आणि पिन होल कॅमेरा लावून ग्राहकांची डेबिट कार्ड माहिती आणि पिन क्रमांक चोरी करण्याचा प्रयत्न एका आरोपीने बुधवारी सायंकाळी आठ वाजता केला. पण, बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आणि बँकेने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार आरोपीचा सायबर सेलच्या पथकाने शोध घेऊन लुक्कास विल्यम (वय ३१, रा. हंडेवाडी, पुणे, मु.रा. नायजेरिया) याला अटक केली. मागील सहा वर्षापासून तो भारतात बेकायदेशीर पध्दतीने राहत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसatmएटीएमfraudधोकेबाजीMONEYपैसा