पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात 'या' तारखेला दोन तासांचा ‘ब्लॉक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:36 IST2021-12-24T21:36:15+5:302021-12-24T21:36:24+5:30
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ‘ओव्हरहेड गँट्रीस्ट्रक्चर’वर संदेश फलक बसविण्याचे काम होणार आहे.

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात 'या' तारखेला दोन तासांचा ‘ब्लॉक’
पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे - मुंबई द्रुतगती महामार्ग २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान ‘ब्लॉक’ केला जाणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ‘ओव्हरहेड गँट्रीस्ट्रक्चर’वर संदेश फलक बसविण्याचे काम होणार आहे. यामुळे मुंबईला जाणारी रस्त्यावरील दोन मार्गिका बंद करून एकाच मार्गावरून वाहने जाऊ दिली जातील. यावेळी सर्व अवजड व माल वाहतूक करणारी वाहने कामापूर्वी थांबविण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी तसेच इतर प्रवासी वाहने एका मार्गिकेवरून संथगतीने सोडण्यात येणार आहेत. महामार्ग सुरक्षा पथकाच्या पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक सजन एच. सस्ते यांनी ही माहिती दिली.