शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोटारीच्या धडकेत दोन उच्चशिक्षित तरुण ठार, तरुणी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:12 IST

भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली.

पुणे/विमाननगर : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश असून जखमी तरुणी मुळची दुबईची आहे.एरीक जोसेफ रॉड्रिक्स (वय २५, रा. मोझेसवाडी, वडगावशेरी) व अमेय रविशेखर आखारे (वय २५, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर सॅनियन कोलन (वय २१, रा. गणेशनगर, दापोडी) ही तरुणी गंभीर जखमी झाली. रॉड्रीक्स हा संगणक अभियंता असून टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी करीत होता. तर आखारे हा त्याचा मित्र होता. त्याचे शिक्षण डिप्लोमापर्यंत झालेले असून तो मूळचा नागपूरचा होता. सॅनियन ही मुळची दुबईची असून ती शिक्षणासाठी पुण्यात आलेली आहे. तिचे आईवडील दुबईमध्ये व्यवसाय करतात. सध्या ती मावशीकडे राहण्यास आहे.येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस असल्याने आखारे आणि सॅनियन हे दोघे मंगळवारी रात्री रॉड्रीक्सला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. घरी जेवण केल्यानंतर रॉड्रीक्स, आखारे एकाच दुचाकीवरून सॅनियनला सोडण्यासाठी तिच्या घरी निघाले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास एकाच दुचाकीवरून ट्रीपल सीट, विनाहेल्मेट जात होते. ब्रह्मा सनसिटी, वडगावशेरी, आदर्शनगरकडून कल्याणीनगरकडे येत असतानाच समोरून भरधाव आलेल्या लाल रंगाच्या मोटारीची त्यांना धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सॅनियनवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे करीत आहेत.पीएमपीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू१ भरधाव पीएमपी बसची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रवेश रामदास कसबे (वय २१, रा. देवगिरीनगर, वाळूंग, औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला. तर विशाल विजय सत्तावान-राजपूत (वय १९, रा. राजनगाव, औरंगाबाद) हा जखमी झाला. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी जय एकनाथ रोरे (वय २१, रा. बजाजनगर, वाळूंज, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हडपसरला पादचारी मृत्युमुखी२ अज्ञात मोटारीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात पादचारी रमाकांत बलवंत मोतीवाले (वय ४०, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळच घडला होता. रस्त्याने पायी जात असताना अज्ञात मोटारीची त्यांना धडक बसली होती. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल घारोळे (वय २२) यांनी फिर्याद दिली असून हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांना अपघाताच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. लाल रंगाच्या मोटारीने त्यांना धडक दिल्याचे दिसत आहे. मात्र, हे फुटेज अस्पष्ट असल्याने मोटारीचा क्रमांक समजत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे