शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पौड आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

By नम्रता फडणीस | Updated: March 12, 2024 16:52 IST

भरधाव वेगाने जाणा-या वाहनांच्या धडकेने अपघातांचे प्रमाण वाढले

पुणे : भरधाव वेगाने जाणा-या वाहनांच्या धडकेमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पौड आणि  कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ महिलेसह दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.       पौड रस्त्यावरील वनाझ मेट्रो स्थानक परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिला मृत्युमुखी पडली. सुनंदा चंद्रकांत सावंत (वय ७३, रा, कुलकर्णी चाळ, गुजरात कॉलनीजवळ, कोथरूड) असे मयत ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक तुकाराम अशोक बनसोडे (वय ३१, रा. हिंगणे होम कॉलनी, कोथरूड) याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी खंडेराव कराटे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनंदा सावंत सोमवारी ( दि. ११ ) दुपारी साडेचारच्या सुमारास वनाज मेट्रो स्थानकाकडून पौड रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव मोटारीने सावंत यांना धडक दिली. गंभीरजखमी झालेल्या सावंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील करत आहेत.

दुसरी घटना  कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुनील बाबुराव जगदाळे (वय ४२, रा. गगटे गठवाडी, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक हबीबुल्ला अब्दुल्ला कोयाथंगल (वय ३९, रा. पुलामंथोल, ता. पेरिन्थलमन्ना, जि.मल्लापुरम, केरळ) याच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजाराम कोलते (वय ५४) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौकातून मंगळवारी (११ मार्च) दुपारी दुचाकीस्वार सुनील जगदाळे निघाले होते. त्यावेळी दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जगदाळे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस हवालदार दिनेश रासकर तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातkatrajकात्रजKondhvaकोंढवाDeathमृत्यू