शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

पुणे : होंडा सिटी कारच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 10:55 IST

बेदरकारपणे होंडा सिटी कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात आजी व नातवाचा मृत्यू झाला आहे.

विमाननगर(पुणे) - बेदरकारपणे होंडा सिटी कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात आजी व नातवाचा मृत्यू झाला आहे.  तर एक जण जखमी झाला. खराडीतील रेडिसन हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी (19 सप्टेंबर) रात्रीच्या  सुमारास हा अपघात घडला. अपघात करून होंडा सिटी कारचा चालक फरार झाला आहे.  या भीषण अपघातात शांताबाई साहेबराव सोनवणे (वय६‍१वर्ष)  व नयन रमेश मोकळे (वय११ वर्ष)  नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार (एमएच १२ एलडी १०‍११) मधील अज्ञात चालकाविरोधात बेदरकारपणे कार चालवून अपघात करुन दोघांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आप्पासाहेब मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री चंदननगर व परिसरातील सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेआठ वाजण्याच्या समारास एका होंडा सिटी कारने काही वाहनांना रेडीसन हॉटेलसमोर धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून चंदननगर पोलिसांना मिळाली होती. चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एक जेष्ठ नागरिक महिला एक लहान बालक व इसम जखमी झाला होता.

अपघात करून होंडा सिटीचा कारचालक फरार झाला. या अपघातातील गंभीर जखमी शांताबाई  सोनवणे व नयन मोकळे यांना नंतर उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याच अपघातात कराड येथील 40 वर्षीय इसमदेखील जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होंडा सिटी कार रेडिसन हॉटेल कडुन टस्कन सोसायटी, खराडीकडे निघाली होती. यावेळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील दोन ते तीन वाहनांना धडक दिली.

याचवेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या शांताबाई सोनवणे व नयन मोकळे या आजी नातवाला देखील या चालकाने उडवले. या दोघंही जण जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPuneपुणे