पुणे - मिरज मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने काही गाड्या रद्द

By अजित घस्ते | Published: March 29, 2024 07:00 PM2024-03-29T19:00:06+5:302024-03-29T19:00:30+5:30

ऐन सुटीच्या कालावधीत ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार

Two days mega block on Pune Miraj route Some trains canceled due to doubling work | पुणे - मिरज मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने काही गाड्या रद्द

पुणे - मिरज मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने काही गाड्या रद्द

पुणे : पुणे विभागातील पुणे-मिरज या लोहमार्गावारीन दुहेरीकरणाचे काम आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेकडून पुणे-सातारा दरम्यान जरंडेश्वर-सातारा सेक्शनवर शनिवार आणि रविवार दोन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पुणे-मिरज मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत. तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. ऐन सुटीच्या कालावधीत ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या...

कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस, पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस, कोल्हापूर-सातारा डेमू, पुणे-सातारा डेमू, कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे डेमू, पुणे-कोल्हापूर डेमू, पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस.

शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या...

(दि. ३० ) ला सातारा-दादर एक्स्प्रेस कराडहून दादरकडे वळवण्यात येईल. म्हणजेच ही गाडी सातारा-कराड दरम्यान रद्द राहील.
(दि. ३० मार्च ) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास पुण्यात संपेल. ही गाडी पुणे-कोल्हापूर रद्द राहील.(दि. ३१ मार्च )कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्याहून गोंदियाकडे वळवली जाईल.

या मार्गांवरून वळवलेल्या गाड्या 

(दि. ३० मार्च ) : चंदीगड - यशवंतपूर एक्स्प्रेस मनमाड-दौंड, पुणे - दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर, मिरज या मार्गाने धावेल.
( दि. ३० मार्च ) : बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस मिरज-पंढरपूर - कुर्डुवाडी - दौंड-पुणे या मार्गावर धावेल.

रीशेड्यूल केलेल्या गाड्या...

(दि. ३१ मार्च ): कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस तिच्या नियोजित सुटण्याच्या वेळेपेक्षा ८.१५ वाजता म्हणजे १२.१५ वाजता चार तास उशिराने सुटेल.
(दि. ३१ मार्च )मुंबई-हॉस्पेट एक्स्प्रेस २१.२० वाजता म्हणजेच ००.२० वाजता सुटण्याच्या नियोजित वेळेपासून तीन तासांनी विलंबाने निघेल.

Web Title: Two days mega block on Pune Miraj route Some trains canceled due to doubling work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.