शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Accident: कात्रज परिसरातील वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:22 IST

पुणे : कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी ...

पुणे : कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकी घसरल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले.

कात्रजमधील शनी मंदिरासमोर भरधाव वेगातील दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोवर्धन उत्तम शिंदे (वय ३७, रा. विजयलक्ष्मी अपार्टमेंट, आगम मंदिर पायथा, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार शिंदे भरधाव वेगाने मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास कात्रजमधील शनी मंदिर परिसरातून जात होता. भरधाव वेगातील दुचाकी घसरून दुचाकीस्वार शिंदे गंभीर जखमी झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिंदेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस हवालदार कचरे तपास करत आहेत.

कात्रज चौकातील स्मशानभूमीजवळ झालेल्या आणखी एका अपघातात दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रमोद गंगाधर छकडे (वय ३०, रा. टिळेकरनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी शिवराम कैलास मराठे (वय २६) आणि राहुल तुकाराम खरात (वय ३४) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार प्रमोद आणि त्याचे मित्र शिवराम आणि राहुल कात्रज चौकातील स्मशानभूमी परिसरातून जात होते. त्या वेळी दुचाकी घसरुन अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार प्रमोद गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातbikeबाईकDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल