शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या भांडणात आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 09:36 IST

खाणीत उडी घेत आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न 

ठळक मुद्देयाचवेळी पती अतुल  यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला   पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा  पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बारामती/पुणे - पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतलेल्या आईला वाचवताना दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळी (ता. बारामती ) येथे हि घटना घडली. या घटनेत ज्या आईला वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उडी घेतली, त्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले आहे. 

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार पती-पत्नीच्या भांडणातून  रागाच्या भरात हि घटना घडली आहे. शनिवारी (दि 29) पहाटे तीन च्या सुमारास हि घटना घडली. पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती ) या पती पत्नी मध्ये भांडण  झाले. त्यामुळे विवाहिता  रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत  पिंपळी येथील  खाणीच्या पाण्याच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी देखील मारली. मात्र, याच वेळी आईला पाहण्यासाठी  त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2)हे दोघे पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात  ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली. 

याचवेळी पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट आज अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीdrowningपाण्यात बुडणेPuneपुणेBaramatiबारामती