शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी गुन्हयातील पैेसे स्विकारल्याप्रकरणी दोन बीट मार्शल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:38 IST

अपहरणकर्त्याकडून खंडणी स्वरूपात वसूल केलेले पैसे स्वीकारणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देखंडणीतील पैसे पोलीस ठाण्याच्या लॉकरमध्ये

पुणे : अपहरण केलेल्या व्यक्तीकडून उकळलेल्या खंडणीतील २ लाख ४० हजार रुपये घेणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलिसांना पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे़. अशोक जकप्पा मसाळ आणि सुरेश सोमलिंग बनसोडे अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत़. याप्रकरणी राहुल मनोहर कटकमवार (वय ३७, रा़ सिंहगड रोड) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.  कटकमवार हे २२ मे रोजी सायंकाळी मोटारीने घरी जात असताना त्यांना बी़ टी़ कवडे रोडवरील सोपान बाग येथे आरोपींनी दुचाकी आडवी घालून थांबायला भाग पाडले़. त्यानंतर त्यांनी मोटारीत शिरुन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. शहरात फिरविल्यानंतर त्यांना घेऊन ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर थांबले होते़. कटकमवार यांनी नातेवाईकांकडून पैसे मागविले होते़ ते देण्यासाठी ते थांबले असताना गस्तीवर असलेले दोन बीट मार्शल मसाळ व बनसोडे यांना त्याचा संशय आला़. त्यांना मोटारीत पैसे आढळल्याने त्यांनी चौकशी केली़ तेव्हा आरोपींनी जमिनीच्या व्यवहारासाठी थांबल्याचे सांगितले़ ते अधिक चौकशी करु लागल्यावर त्यांच्यातील एकाने पोलिसांना बाजूला घेऊन खंडणीच्या पैशातील २ लाख ४० हजार दिले़. त्यानंतर बीट मार्शल निघून गेले़. कटकमवार यांनी सहआयुक्त रवींद्र कदम यांच्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडे सोपविण्यात आला आहे़. पोलिसांविषयीची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली़. रात्रीच्या वेळी गस्तीवर कोण होते, याची चौकशी करण्यात आली़. त्यात या दोघांची नावे निष्पन्न झाली होती़. खंडणीतील पैसे पोलीस ठाण्याच्या लॉकरमध्येत्या रात्री गस्तीवर अशोक मसाळ आणि सुरेश बनसोडे असल्याचे दिसून आल्यावर त्यांच्याकडे चौकशी केली़. त्यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले़. त्यांनी हे पैसे पोलीस ठाण्यातील त्यांच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे़. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी त्या दोघांना निलंबित केले़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsuspensionनिलंबनCrimeगुन्हा