शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक; असे आले गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 9:59 PM

जंगली महाराज रोडवरील सेंटरचे देत होते रिपोर्ट

पुणे : कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणार्‍या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रोडवरील एका वैद्यकीय चाचणी करणार्‍या लॅबच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे  (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत लॅबच्या व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावाने हे दोघे बनावट रिपोर्ट देत होते. लोकांच्या मागणीनुसार ते निगेटिव्ह, पॉसिटिव्ह रिर्पोट देत होते. समोरचा व्यक्ती कसा आहे, हे पाहून ते कोणतीही तपासणी न करता रिपोर्ट  देत होते. डेक्कन पोलिसांना मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक अभिजित कुदळे, इनामदार, देवडे, शिंदे, पाटील, पानपाटील यांनी या दोघांना पकडले. असा उघडकीस आला प्रकार

सागर हांडे आणि दयानंद खराटे हे दोघे पूर्वी एका लॅबमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांना रिपोर्ट कसे तयार करतात, याची माहिती होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना वेगवेगळ्या कामासाठी कोरोना चाचणी केल्याचा व ती निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट हवा असतो. काहींना प्रवास करायचा असतो, त्यासाठी तातडीने रिपोर्ट कोठे मिळेल, याची लोक चौकशी करीत. त्यातून हे दोघे संबंधितांना तातडीने रिपोर्ट देण्याचे आश्वासन देऊन संबंधितांच्या घरी जाऊन सँपल घेत. त्यासाठी ते आवश्यक ती सावधगिरी व किट घालून जात असत. त्यानंतर त्यांना हवा तसा रिर्पोट देत. अनेकदा सँपल घेतलेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, यावरुन निगेटिव्ह अथवा पॉसिटिव्ह रिपोर्ट देत असत. 

जंगली महाराज रोडवरील या लॅबच्या एका ग्राहकालाही त्यांनी बनावट निगेटिव्ह रिपोर्ट  दिला. मात्र, त्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याने लॅबला फोन करुन आपल्याला त्रास होत असताना माझा निगेटिव्ह रिपोर्ट कसा आला, अशी चौकशी केली. लॅबच्या व्यवस्थापकांनी त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर त्यांच्या लॅबमधून अशा प्रकारचा कोणताही रिपोर्ट देण्यात आल्याचे आढळून आले़ नाही. त्यामुळे आपल्या नावावर कोणीही बनावट रिपोर्ट देत असल्याचे लक्षात आल्यावर लॅब व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले. गेल्या एक महिन्यांपासून ही जोडगळी बनावट रिर्पोर्ट देत असल्याचे सांगत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस