मेफेड्रॉन विक्रीसाठी नवी मुंबईतील आलेल्या महिलेसह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 14:36 IST2020-07-12T14:36:09+5:302020-07-12T14:36:16+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकार्यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.

मेफेड्रॉन विक्रीसाठी नवी मुंबईतील आलेल्या महिलेसह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा माल जप्त
पुणे : अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाख
रुपयांचे मेफेड्रोन (एम डी) पोलिसांनी जप्त केला आहे. विवेक तुळशीराम लुल्ला (वय ४३) व हेमा किसनलाल सिंग (वय ३०, दोघेही रा. नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकार्यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बाणेर येथील नॅशनल इन्श्युरन्स अॅकॅडेमी या ठिकाणी सापळा लावला. त्या ठिकाणी आलेल्या दोघांच्या हालचाली संशयास्पदरीत्या आढळून आल्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ३ लाख २७ हजार २५० रुपयांचा ६५ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळाला. दोन मोबाईल, १ हजार रुपये रोख असा ३ लाख ३१ हजार ३१ हजार ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.