वाटमाऱ्या करणाऱ्या दोघांना अटक
By Admin | Updated: January 12, 2017 03:22 IST2017-01-12T03:22:20+5:302017-01-12T03:22:20+5:30
रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना लुटणाऱ्या दोन जणांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले असून त्यांतील

वाटमाऱ्या करणाऱ्या दोघांना अटक
पुणे : रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना लुटणाऱ्या दोन जणांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले असून त्यांतील एकाला पनवेल येथील डान्सबारमध्ये सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडून उघडकीस आणण्यात आलेल्या १२ गुन्ह्यांमध्ये ४ लाख ५० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांनी दिली.
नीलेश संजय सस्ते (वय २२, रा. ज्योतीबानगर, शंभुराज कॉलनी, काळेवाडी, पिंपरी), सूरज ऊर्फ सुब्बा ऊर्फ सुरेश रवींद्र कांबळे (वय ३०, रा. साईबाबा मंदिरासमोर, लमाणतांडा, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज कुंदनदास तारवाणी (वय ४६, रा. नाईन हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) हे ३ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास एनआयबीएम रस्त्याने जात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवत ‘तू माझ्या बहिणीला दररोज का छेडतोस?’ अशी विचारणा करून गळ्याला सुरा लावून सोनसाखळी आणि अंगठ्या काढून नेल्या होत्या. आरोपींनी वापरलेल्या दुचाकीबाबत वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार, सस्ते याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कांबळे याचे नाव समोर आले.
कांबळे याला पनवेल येथील लेडीज बारवर जाण्याची सवय असल्याची माहिती मिळताच तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विशाल वळवी, राजस शेख, सुभाष जाधव, संजय कदम, पृथ्वीराज पांडुळे, गणेश गायकवाड, संजीव कळंबे, रमेश राठोड, अमित साळुंके, सुरेंद्र कोळगे, आझीम शेख, उमाकांत स्वामी, दीपक क्षीरसागर, सैफ नदा यांनी दोन दिवस पनवेलमध्ये सापळा लावला. लेडीज बारवर येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले. या दोघांनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळीचोरी, घरफोड्या, जबरी चोऱ्या तसेच वाहनचोऱ्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी १२५ ग्रॅम सोन्यासह ४ दुचाकीही जप्त केल्या आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, कल्पना बारवकर, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)
एटीएम कार्ड जबरदस्तीने काढले
४भारती विद्यापीठ पोलिसांनी हसन इम्रान शेख (रा. भुमकरनगर, नऱ्हे), विशाल शरणाप्पा साखरे (रा. इंदिरानगर, लोहगाव रस्ता) या दोघांना तरुणाला लुटल्याप्रकरणी अटक केली आहे. या दोघांनी प्रशांत कसबे (वय ३४, रा. उंड्री, वडाचीवाडी) यांना ६ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना अडवले होते. त्यांना ‘गाडी नीट चालवता येत नाही का? कट का मारलास? अशी विचारणा करून मारहाण करून दोन हजार रुपये व एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून नेले होते.