ड्रायव्हिंग स्कूल अडचणीत

By Admin | Updated: March 20, 2015 01:12 IST2015-03-20T01:12:22+5:302015-03-20T01:12:22+5:30

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने खासगी वाहनचालक प्रशिक्षण संस्था (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) सुरू करण्यासाठीचे निकष बदलले आहेत.

Turning to the Driving School | ड्रायव्हिंग स्कूल अडचणीत

ड्रायव्हिंग स्कूल अडचणीत

पिंपरी : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने खासगी वाहनचालक प्रशिक्षण संस्था (मोटार ड्रायव्हिंग स्कूल) सुरू करण्यासाठीचे निकष बदलले आहेत. नव्या नियमावलीनुसार खासगी वाहन चालक प्रशिक्षण संस्था सुरू ठेवणे कठीण होऊ लागल्याने पुणे, पिंपरी -चिंचवडमधील अनेक वाहन चालक प्रशिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिंपरी चिंचवडमधील १३० पैकी ३० संस्थांनी अद्यापपर्यंत गाशा गुंडाळला आहे.
आतापर्यंत प्रादेशिक परिवहन अथवा आरटीओ वावरणाऱ्या दलांलामार्फत सहज वाहन चालविण्याचा परवाना मिळविता येत होता. परिवहन आयुक्तपदी रूजू होताच महेश झगडे यांनी आरटीओतील दलाल हटविण्याची मोहिम हाती घेतली. काही ठिकाणी वाहन चालक प्रशिक्षण संस्थाचालक दलाल म्हणुन काम करीत होते. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास येणाऱ्यांना वाहनचालक परवाना मिळवून देण्यापर्यंतची कामे त्यांच्यामार्फत केली जात होती. अलिकडच्या काळात शिकाऊ परवान्यासाठीही दोन महिने आगोदर ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेट’ घेणे बंधनकारक केले आहे. वाहनचालविण्याचे परवाने पोस्टाद्वारे घरपोच देण्याचे धोरण अवलंबले गेले. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्याची प्रशिक्षण संस्थांचालक आता हमी देऊ शकत नाहित. शासनाने वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन केंद्र (आयडीटीआर) हे प्रशिक्षण आणि चाचणी केंद्र सुरू केले आहे. त्या ठिकाणी अत्याधुनिक ‘ट्रॅक’वर वाहनचालकाला चाचणी द्यावी लागते. त्यामुळे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शिकविण्याचा मोबदला मिळणेही कठीण झाले आहे. शहरातील
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण
देणाऱ्या खासगी संस्था अडचणीत आल्या आहेत.

Web Title: Turning to the Driving School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.