शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

तुकाराम मुंढे यांना हटविण्याच्या हालचाली, लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:14 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय झाल्या आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचा-यांवर सुरू केलेली कारवाई, तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राजकीय’ हस्तक्षेप पूर्णपणे बंद केला आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना सक्रिय झाल्या आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचा-यांवर सुरू केलेली कारवाई, तसेच ‘पीएमपी’च्या कारभारातील ‘राजकीय’ हस्तक्षेप पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे मुंढे यांना हटविण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न सुरू आहेत.शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ या स्वतंत्र कंपनीची निर्मिती झाल्यानंतर बससेवा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, २००७ नंतर दरवर्षी पीएमपीच्या तोट्यात वाढच होत गेली. कोलमडलेली प्रशासकीय व्यवस्था, खिळखिळ््या बस, अधिकारी व कर्मचाºयांची मनमानी असे चित्र निर्माण झाले. तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात आणखीच भर पडल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. अनेक अधिकारी आले अन् गेले, पण ‘पीएमपी’च्या स्थितीत फरक पडला नाही. त्यासाठी मुंढे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी ‘पीएमपी’त यावेत, यासाठी अनेकांनी आग्रही भूमिका घेतली.पण, मागील एप्रिल महिन्यापासून यातीलच काही जण आता मुंढेंच्या कामाच्या पद्धतीवर फुली मारू लागले आहेत. पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंढे यांच्या बदलीसाठी साकडे घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे दोन्ही पालिकांतील पदाधिकाºयांशी खटके उडू लागले. लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाºयांनीही मुंढे यांची कार्यशैली हिटलरप्रमाणे असल्याचे म्हटले होते. ‘पीएमपी’त होणारा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करून मुंढे यांनी सत्ताधाºयांसह सर्व राजकीय पक्षांना दूर ठेवले. त्यामुळेही अनेक पदाधिकारी मुंढे यांच्यावर नाराज असून त्यांच्या बदलीसाठी आग्रही आहेत.पीएमपीमध्ये घडी बसविण्याचा प्रयत्न- मागील दहा महिन्यांत प्रशासनाची व्यवस्थित घडी बसविली आहे. मात्र, हे करताना त्यांनी शेकडो कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला. यामध्ये काही पुढाºयांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.- पदाधिकाºयांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आलेले तोट्यातील मार्ग, पास केंद्रही त्यांनी बंद केले. कर्मचारी संघटनांनाही त्यांनी अनधिकृत ठरविले.- पंचिंग पास बंद करणे, तसेच पासदरांमध्ये बदल, तसेच पीएमपीचीस्थिती अद्याप सुधारत नसल्याचा दावा करीत प्रवासी संघटनाही नाराजी व्यक्त करीत आहेत.- विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह कर्मचारी संघटनाही आता मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागले आहेत.- वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे