शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालये फुल्ल; मुहूर्तात आले विघ्न

By admin | Updated: March 11, 2015 00:57 IST

लग्नघटिकेचा मुहूर्त साधण्यासाठी आता काही महिनेच उरले असताना शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग फुल्ल झाले आहे

पिंपरी : लग्नघटिकेचा मुहूर्त साधण्यासाठी आता काही महिनेच उरले असताना शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग फुल्ल झाले आहे. परिणामी, रेशीमगाठी बांधण्याच्या तयारीतील वधू-वराकडील मंडळींची आता मंगल कार्यालयाच्या शोधासाठी चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यातही अपेक्षित ठिकाणाऐवजी मिळेल त्या दालनातच आपल्या पाल्यांचे मंगलकार्य उरकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. या वर्षीच्या लग्नसराईनुसार १२ जूनपर्यंतच लग्नाचे शुभमुहूर्त आहेत. त्यातही जूनपर्यंत ठरावीकच शुभमुहूर्त आहेत. अनेक जण काढीव मुहूर्तावर लग्न करण्याचे टाळतात. याचबरोबर जुलैपासून नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा १३ महिने चालणार आहे. त्यामुळे २०१५-२०१६ या वर्षातील लग्नसराईत (तुलसी विवाह ते गणेश चतुर्थीपर्यंत) तिथीनुसार लग्न करणे शक्य होणार नाही. यानंतर श्रावण महिन्यापासून चातुर्मास असल्याने २०१६च्या दिवाळीपर्यंत रेशीमगाठी बांधणे शक्य होणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या परिसरात १००पेक्षा अधिक मंगल कार्यालये, लॉन्स व हॉल आहेत. त्यामध्ये भोसरी येथे सर्वाधिक ८ कार्यालये व लॉन्स आहेत. मोशी, चऱ्होली, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, रावेत, चिंचवड यासह विविध भागात कार्यालये आहेत. (प्रतिनिधी)