शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबांचा पालखीसोहळा आकुर्डी मुक्कामी

By admin | Updated: July 10, 2015 01:45 IST

पंजाबपासून कर्नाटकापर्यंतचे वारकरी हरिनामाचा गजर करीत आज सकाळी ११ वाजता देहूनगरीतून उत्साहाच्या वातावरणात टाळ-मृदंगाच्या व तुतारीच्या निनादात पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाली.

देहूगाव :‘‘पुण्य उभे राहो आता ।संताचिये कारणे ।।पंढरीच्या लागा वाटे ।सखा भेचे पांडुरंग ।।या अभंगाप्रमाणे पंजाबपासून कर्नाटकापर्यंतचे वारकरी हरिनामाचा गजर करीत आज सकाळी ११ वाजता देहूनगरीतून उत्साहाच्या वातावरणात टाळ-मृदंगाच्या व तुतारीच्या निनादात पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाली. पालखीला निरोप देण्यासाठी देहूगावासह, विठ्ठलनगर, चिखली, तळवडे, माळीनगर, येलवाडी, ाुदुंबरे,सांगुर्डी, कान्हेवाडी, झेंडेमळा, काळोखेमळा, किन्हई, चिंचोली परिसरातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तत्पूर्वी पहिल्या मुक्कामासाठी इनामदारवाड्यात असलेल्या पालखीतील पादुकांची सकाळी नऊला परंपरेप्रमाणे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांच्या हस्ते विधिवत शासकीय महापूजा करण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार किरण काकडे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अभिजित मोरे, विश्वस्त सुनील दामोदर मोरे, दिलीप मोरे इनामदार व प्रिया मोरे इनामदार आदी उपस्थित होते. या पालखी मार्गावर ग्रामपंचायतीच्या चौकात, महाद्वार कमानीमध्ये वाल्हेकरवाडी येथील ज्योती कोल्हे यांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या. पालखी महाद्वार कमानीमध्ये आल्यानंतर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. यानंतर पालखी दुपारी १२ वाजता अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ पहिल्या अभंग आरतीसाठी थांबली. येथे प्रथेप्रमाणे आरती झाल्यानंतर पालखी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली. या आरतीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, साहेबराव काशीद, माजी नगरसेवक जयंत बागल उपस्थित होते. झेंडेमळा येथील देहू शस्त्रास्त्र भांडाराच्या प्रवेशद्वारात आदेशक ब्रिगेडियर नरेंद्र पटेल, कर्नल सुरेशकुमार यांनी स्वागत केले. या वेळी सीओडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मयूर डोळस व सचिव महेंद्र कांबळे, पदाधिकारी धनंजय शेटे, सुनील दाभाडे आदी उपस्थित होते. चिंचोलीत पालखी आल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी केली. शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय जाधव व धनंजय सावंत यांच्या हस्ते दुसरी अभंग आरती झाली. कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी व उपाध्यक्ष राहुल बालघरे यांनी स्वागत केले. या वेळी नगरसेवक बाळासाहेब तरस, रेड झोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, बाळासाहेब जाधव, सचिव रमेश जाधव, नगरसेवक रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल,अरुणा पिंजण, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक संभाजी भसे आदी उपस्थित होते. देहूरोड येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या वतीने महाप्रबंधक आर.के. तिवारी यांनी स्वागत केले. आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका, ठिकठिकाणी डॉक्टरांचे पथक, कॅन्टोन्मेंट बोर्ड व लायन्स क्लब, पवना हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सुविधा व औषधे पुरविली. महसूल विभागाच्या वतीने अप्पर तहसीलदार किरण काकडे यांनी वृक्षारोपण केले. या वेळी कृषी सहायक सुनील राजे व प्रदीप काळोखे, मंडल अधिकारी चंद्रकांत पाटील, मिलिंद मनवर आदी उपस्थित होते. येथील श्री शिवाजी विद्यालयातील स्काऊट व गाइडच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून पालखीसोहळ्यात मुली वाचवा, पाणी वाचवा, अशा प्रकारचा संदेश दिला. यात प्राचार्य काशीनाथ नवले, पर्यवेक्षक प्रवीण गणबोटे, बाबाजी आहेर, रंजना सपकाळे, सविता नाणेकर, माधुरी खालकर, अनुराधा घोडके, नीलेश मानकर, अरुण कदम व श्री कांबळे यांनी सहभाग घेतला. देहूगाव येथे शिरीषकुमार मित्र मंडळाने अन्नदान केले. रोटरी क्लब आॅफ देहूगावच्या वतीने प्लॅस्टिकचे कागद वाटले. (वार्ताहर)