शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भारतामध्ये पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात : नरेंद्र बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 19:12 IST

प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देशालेय, महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये हॉकी खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न : बत्रालेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे : हितेन जैन

पुणे : फाईव्ह अ साईड (मिक्स हॉकी) हॉकी आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गावात आणि शहरात  प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने बत्रा पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, फाईव्ह अ साईड हॉकी मिक्स ठेवण्याचा उद्देश असा आहे की काही वेळेस पुरुष चांगले खेळतात त्यावेळी महिलांचा खेळ होत नाही. या स्पर्धेमुळे पुरुषांबरोबर खेळून महिलांच्या खेळामध्येसुद्धा सुधारणा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. पुरुष व महिला एकत्र खेळल्यामुळे महिलांमधील आत्मविश्वासही वाढविण्यास मदत होईल.  यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये हॉकी खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल. फाईव्ह अ साईड हॉकीसाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता नाही. ही बागेत, शाळेतील आणि महाविद्यालयांतील लहान उद्यानांसह आपल्या सोसायटीमध्येसुद्धा खेळता येणार आहे. सध्या भारतीय महिला व पुरुष वरिष्ठ संघांची कामगिरी कौतुकास्पद आहे. नुकतेच त्यांनी आशियाई चषक जिंकले आहे. आगामी राष्ट्रकूल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी दोन्ही संघांचे नियोजन आमच्याकडे तयार आहे. दोन्ही संघ काही मित्रात्वाचे सामने खेळाण्यासाठी परदेशात जाणार आहेत. आमचा मुख्य उद्देश आगामी स्पर्धांमध्ये असा राहणार आहे की आमचे दोन्ही संघ चांगल्या खेळाचे प्रयत्न करून उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील असे त्यांचे सरावांचे नियोजन ठेवण्यात आले आहे. समजा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरला तर निदान तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी त्याने खेळावे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ मानांकनात भारताने अव्वल तीनमध्ये रहावे अशी आमचे प्रयत्न राहतील. 

भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेले बत्रा यांना पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. २७, २८, २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. २९ तारखेला आपल्याला कळेलच की कोण-कोण कोणत्या कोणत्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरेल. गेल्या दोन वर्षांत विविध स्पर्धांना संघ पाठविण्याच्या व्यतिरिक्त सध्याचे असलेले अध्यक्ष यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. भारतीय आॅलिम्पिक संघाच्या माध्यमातून देशामध्ये जास्तीत जास्त क्रीडा संस्कृती टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना करता येऊ शकतात पण याबाबतीत काहीही झालेले नाही. त्यामुळे त्या समितीवर योग्य नियोजन व अचूक निर्णय घेणारीच व्यक्तीच यायला हवी.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हॉकीचे खेळाडू (मुले-मुली) तयार व्हावीत आणि त्यांनी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करावे. फाईव्ह अ साईड हॉकीमुळे शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींना हॉकीचा आनंद नक्कीच लुटता येणार आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्रामध्येसुद्धा पूर्वीचे हॉकीचे दिवस येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहे. यामुळे हॉकीची लोकप्रियता पुन्हा वाढेल. औरंगाबादमध्ये आम्ही घेतलेल्या बैठकीमध्ये काही निर्णयसुद्धा घेतले आहेत की ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हॉकीची मैदाने तयार होतील. लेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे.- हितेन जैन, अध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र 

टॅग्स :HockeyहॉकीPuneपुणेSportsक्रीडा