सविता भाभीच्या फ्लेक्स मागील 'हे' आहे सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:03 IST2020-02-17T15:52:22+5:302020-02-17T16:03:04+5:30

पुण्यातील विविध भागांमध्ये 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' हा मजकूर असलेले फ्लेक्स लागले हाेते. त्या फ्लेक्स मागील सत्य आता समाेर आले आहे.

this is the truth behind the secret flex | सविता भाभीच्या फ्लेक्स मागील 'हे' आहे सत्य !

सविता भाभीच्या फ्लेक्स मागील 'हे' आहे सत्य !

पुणे : पुणे आणि अजब फ्लेक्स यांचं एक रसायन तयार झालं आहे. गेल्या काही काळात शहरामध्ये विविध प्रकारचे गुढ निर्माण करणारे फ्लेक्स लावण्यात आले हाेते. नुकताच 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' असे लिहीलेले फ्लेक्स शहरातील विविध भागात लावण्यात आले हाेते. या फ्लेक्समुळे पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली हाेती. त्या फ्लेक्स मागील गुपीत आता समाेर आले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुण्यात विविध ठिकाणी  'सविता भाभी... तू इथंच थांब !!' या मजकूराचे फ्लेक्स सर्वत्र लागले हाेते. काळ्या रंगाच्या फ्लेक्सवर पिवळ्या रंगामध्ये हा मजकूर लिहीण्यात आला हाेता. हा फ्लेक्स म्हणजे सिनेमाच्या प्रमाेशनची क्लुप्ती हाेती. धर्मकिर्ती लिखित आणि आलाेक राजवाडे दिग्दर्शित 'अश्लिल उद्याेग' हा सिनेमा 6 मार्चला रिलीज हाेणार आहे. या सिनेमाचे पाेस्टर तसेच ट्रेलर नुकताच लाॅंच करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये सविता भाभी नावाचे पात्र दाखविण्यात आले आहे. तरुणांच्या लैंगिक भावानांवर हा सिनेमा आधारीत आहे. यात अभय महाजन, पर्ण पेठे, सई ताम्हणकरअमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

या सिनेमाच्या प्रमाेशनसाठी ही नवीन क्लुप्ती लढविण्यात आली हाेती. या फ्लेक्समुळे वेगळीच उत्सुकता निर्माण झाली हाेती. परंतु 'अश्लिल उद्याेग' या सिनेमाच्या ट्रेलर लाॅंचनंतर या फ्लेक्स मागील सत्य बाहेर आले आहे. 

Web Title: this is the truth behind the secret flex