शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आश्चर्य वाटेल पण खरं आहे! फक्त ४८ तासांत पोलिसांना आले तब्बल १७ हजार ४७९ संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 12:44 IST

आलेल्या संदेशांपैकी ७ हजार ६१५ तातडीचे संदेश

ठळक मुद्दे८० टक्क्यांना परवानगी : ट्विटरवर ५ हजार मेसेज

पुणे : लॉकडाऊन केल्यानंतर गेल्या दोन दिवसात पोलिसांच्या चार व्हॉटसअप क्रमांकावर तब्बल १७ हजार ४७९ संदेश प्राप्त झाले़.त्यापैकी तब्बल ८० टक्के संदेशांना पोलिसांनी परवानगी दिली. आलेल्या संदेशांपैकी ७ हजार ६१५ तातडीचे संदेश होता. या संदेशापैकी ५० टक्के वैद्यकीय सेवा परवानगी मिळावी, यासाठी होत. त्यामध्ये कॅन्सर, मधुमेह, अल्जायमर, डायलीसीस, गरोदर महिला वगैरे याबाबत होते. २० टक्के हॉस्पिटल सेवा संदर्भात स्टाफ, नसेर्से, पॅथोलॉजी यांचे संदर्भात होते. त्यांना परवानगी देण्यात आली़ तसेच ५ टक्के विद्यार्थी जे होस्टेलमध्ये राहत आहेत व त्यांना जेवणाबाबत गैरसोय होत असल्याबाबत होते. ५ टक्के वयोवृद्ध आईवडिल, पत्नी, लहान मुले यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी घेऊन जाण्याबाबत परवानगीबाबत होते. त्यांना परवानगी देण्यात आली. पोलिसांच्या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर आलेल्या संदेशापैकी आज दिवसात ५ हजार ६८३ संदेशांना उत्तर देण्यात आले़. कंपन्यांकडून आतापर्यंत २३३ ई मेल पोलिसांना मिळाले असून त्यांना डिजिटल परवाने दिले जात आहेत. पोलिसांकडे , फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप आणि पुणे पोलिसांच्या संकेत स्थळावरुन सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. ट्विटरमार्फत सुमारे ५ हजार संदेश प्राप्त झाले आहेत. तसेच त्यावरुन नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये, तसेच उपलब्ध असलेल्या प्रतिबंधक सूचनांकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात येत आहे. बंगलुरु येथून नुकतेच पुण्यात बदली होऊन आलेल्या दांपत्यांचे घरगुती सामान ट्रॉन्सपोर्टमध्ये अडकले होते. या ट्रान्सपोर्टला संपर्क साधून या दांपत्याची समस्या निवारण करण्यात आली. पुण्यामध्ये कामानिमित्त आईवडिलांना सोडून एक तरुणी एका ठिकाणी रहात होती. त्या ठिकाणी ती एकटी असल्यामुळे अस्वस्थ होती़.तिने पोलिसांकडे मदत मागितली़. तिला योग्य मार्गदर्शन करुन तिचे वडिलांमार्फत पुण्यामध्ये दुसरीकडे तिची राहण्याची सोय झाल्यावर त्या ठिकाणी तिला पोलिसांनी जाण्यासाठी मदत केली, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी कळविली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMessengerमेसेंजर