माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:57 IST2023-08-15T17:48:17+5:302023-08-15T17:57:53+5:30
या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
उदापूर : माळशेज घाट मार्गावर सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान कल्याण वरून नगरच्या दिशेने येणाऱ्या जड वाहतूक करणारा ट्रक मढ जवळील खिंडीमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे तसेच साईडला असलेला भराव खचला आणि ट्रक शेजारी असलेल्या भाताच्या खचरात पलटी झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी भात पिकाचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. मार्गावर लांबच लांब वाहतुक करणाऱ्या गाड्यांची रांग लागल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या महामार्गावरून एकेरी वाहतूक थोड्या थोड्या प्रमाणात चालू होती. सुदैवाने या दोन्ही घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे. सध्या माळशेज घाट परिसरात जोरदार पावसाची हजेरी असल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागल्याचे दिसत आहे महामार्गावर खड्डे खड्डे पाहायला मिळत आहे. या रस्त्याचे काम चालू असले तरी हे काम अगदी संथ गतीने चालू असल्यामुळे अजून किती दिवस या महामार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागणार हे सांगणे कठीणच आहे.