शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 8:11 PM

घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या..

ठळक मुद्देवरंधा घाटातील पडलेली संरक्षक भितीचे काम लवकर करण्याची मागणी 

भोर - कोकणात जाणारा जवळचा मार्ग असल्याने भोर- महाड मार्गावरील वरंधा घाट मार्गे प्रवास करण्याकडे प्रवास नागरिक आणि वाहन चालकांचा अधिक कल असतो. मात्र, महाडच्या दिशेला दरड पडल्यामुळे वरंधा घाटातून फक्त लहान गाड्यांची वाहतुक सुरु आहे. मोठया आणि अवजड वाहनांना वाहतुक करण्यास परवानगी नाही.परंतु, काही चालक या नियमांकडे दुर्लक्ष करून सर्रास या मार्गे वाहतूक करतात. अशाचप्रकारे एक ट्रक बुधवारी सकाळपासून घाटात अडकून पडला.त्यामुळे घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.     भोर- महाड रस्त्यावरील वरंधा घाटाच्या महाडच्या हद्दीत रस्त्याची जुनी संरक्षक भिंत मागच्या महिन्यात कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर सायंकाळी ५ ते सकाळी ८ या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून,फक्त सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुचाकी व चारचाकी लहान गाड्या काही प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील रस्ता बंद असल्याचे फलक अनेक ठिकाणी लावले आहेत. तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या अवजड वाहनांच्या चालकांना घाट बंद असल्याबाबत सांगत आहेत.मात्र तरीही चालक त्याकडे दुर्लक्ष करून हेकेखोरपणे घाटातूनच प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा अवजड वाहने घाटात अडकुन बसण्याच्या घटना घडतात.

      बुधवारी सकाळी एक १४ चाकांचा मोठा ट्रक भोरवरुन वरंधा घाटातून महाडला निघाला होता.हा ट्रक घाटाच्या भोर बाजूकडील रस्ता पार करून झाल्यावर महाडच्या बाजूला संरक्षक भिंत कोसळलेल्या भागात रस्त्यावर अडकून पडला.वळणाचा आणि खचलेला रस्ता असल्यामुळे ट्रक चालकास ट्रक पुढेमागे हलविता आला नाही.त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या. ट्रकला हलविण्यासाठी महाडच्या बाजूने जेसीबी आणण्यात आला आहे.मात्र,अपघाती जागा असल्यामुळे त्यालाही अनेक अडचणी निर्माण होत आहेत.सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक काढण्याचे काम सुरू होते.महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील महाड बाजूकडील मार्ग लोखंडी पाइप टाकून बंद केला असल्याचे महाड पोलिसांकडून सांगण्यात आले.        वरंधा घाटातील पडलेली संरक्षक भितीचे काम लवकर करण्याची मागणी कोकणात जाणारा जवळचा मार्ग असल्याने याचा आधिक वापर केला जातो. शिवाय भाजीपाला, माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांसह पर्यटकही याच मार्गाचा वापर जास्तीत जास्त वापर करतात. त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरची संरक्षक भिंत लवकर दूरुस्त करण्याची मागणी प्रवासी नागरिक करत आहेत.

टॅग्स :bhor-acभोरtourismपर्यटनmahad-acमहाडTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस