भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:24 IST2020-06-04T15:22:38+5:302020-06-04T15:24:20+5:30

पावसाळी पर्यटनाकरिता ट्रेकर मंडळींचे आवडते ठिकाण असलेल्या राजमाची गावाला निसर्ग चक्री वादळाने पुरते उध्वस्त केले आहे.

Trekkers own village of 'rajmachi' was destroyed by the 'nisarga' cyclone | भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा

भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा

ठळक मुद्दे 20 घरे उडाली; वन्हाटी ठाकरवाडी उध्वस्त

लोणावळा : राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची गावाची निसर्ग वादळाने पुरती धुळधान केली आहे. 25 घरांचे गाव असलेल्या राजमाची गावातील 20 घरांचे पत्रे उडाले आहेत, काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. शेजारी असलेल्या वन्हाटी ठाकरवाडीतील 16 घराची वस्ती पुरती उडून गेली आहेत.


     पावसाळी पर्यटनाकरिता ट्रेकर मंडळींचे आवडते ठिकाण असलेल्या राजमाची गावाला निसर्ग चक्री वादळाने पुरते उध्वस्त केले आहे. कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना चक्री वादळाने रस्त्यावर आणले आहे. पावसाळा सुरु झाल्याने नागरिकांनी घरामध्ये धान्यसाठा करून ठेवला होता. पाऊस व वार्‍यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने घरांमध्ये पाणी साचले. संपुर्ण गावात बुधवारी चुल पेटली नाही. जी काही चार पाच घरं या वादळात शिल्लक राहिली त्यांचा नागरिकांनी आसरा घेतला होता. 

आज सकाळी पावसाचा जोर व वार्‍याचा वेग कमी झाल्याने नगरसेवक राजु बच्चे, विशाल पाडाळे यांनी शासकिय यंत्रणेसह राजमाची गावाकडे धाव घेतली. राजमाची गावाला जाण्याकरिता पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना घरी दुरुस्तीची कामे करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागणार आहे. राजमाची गावाप्रमाणे वन्हाटी ही ठाकरवस्ती पुर्णपणे उडून गेली आहे. याठिकाणी असलेल्या 16 कुठुबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासनाने तात्काळ याभागाचा पंचनामा करत त्यांना मदत करावी अन्यथा त्यांनी तात्पुरती दुसरीकडे राहण्याची सुविधा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Trekkers own village of 'rajmachi' was destroyed by the 'nisarga' cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.