पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:53 AM2019-09-18T11:53:06+5:302019-09-18T12:00:16+5:30

मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे.

tree branches cutting due to mahajanadesh yatra in sinhgad road at pune | पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

Next
ठळक मुद्देआता अन्य कारणांचा दावापालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूदयाच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित

पुणे: मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेतील भल्या मोठ्या उंचीच्या रथसदृश वाहनाला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या त्यांच्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत ओरड होऊ लागल्यावर आता रस्त्यावरच्या वाहनांना तसेच विजेच्या तारांना अडथळा होत असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 
एखाद्या वृक्षाची फांदी तोडायची असेल तर त्यासाठी कायदा केला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज करावा, वृक्ष अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करेल व अहवाल तयार करेल, त्यानंतर समितीत या अहवालावर चर्चा होईल, आवश्यकता असेल तर समितीचे सदस्य पाहणी करतील व त्यानंतर परवानगी मिळेल असा नियम आहे. त्याचे पालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याला दंडात्मक किंवा कारावासाचीही शिक्षा आहे. याच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित आहे.
ज्या समितीने हे सर्व करायचे त्याच समितीने सिंहगड रस्त्यावर जुन्या डेरेदार वृक्षांच्या फांद्यावर कुकुऱ्हाड ºहाड चालवली आहे. सिंहगड चौकापासून पुढे थेट राजाराम पुलापर्यंत किमान ५० वृक्षांच्या फांद्या यात बेमुर्वतपणे तोडल्या आहेत. अडथळा ठरेल इतकाच भाग तोडणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र या फांद्या थेट खोडापासूनच तोडल्या आहेत. झाडाचे नुकसान होईल, खरोखरच गरज आहे का याची काहीही काळजी न घेता ही तोड झाली असल्याचे स्पष्ट निदर्शनास येते आहे. फांदी तोडलेल्या काही झाडांची पाहणी केली तरी ही बाब लगेचच लक्षात येते.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील त्यांचे रथसदृश वाहन बरेच उंच होते. त्यावर पुन्हा वरील बाजूला स्टेज तयार केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी उभे राहणार व त्यांच्या पुढूमागून अन्य वाहने धावणार अशी ही जनादेश यात्रा होती. या उंच वाहनाला कसलाही अडथळा होऊ नये याची काळजी म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीने ही फांदीतोड विनापरवाना केली. वीज वितरण कंपनी, पीएमपीएल यांनी परवानगी मागणारे अर्ज केले होते, अशी महिती आता प्रशासनाकडून सांगण्यात येते. परवानगी त्यांना द्यायची तर तोडही त्यांनाच का करू दिली नाही याचे उत्तर या खात्याकडे नाही. 
या रस्त्यांवरून धावणारे अन्य कोणतेही वाहन मुख्यमंत्र्यांच्या त्या रथसदृश वाहनाइतके उंच असत नाही.ज्या शहरांमधून ही यात्रा आली व पुढे ज्या शहरांमध्ये जाणार आहे तिथेही रस्त्यावर अडथळा येत असलेल्या फांद्या याच पद्धतीने तोडण्यात येतात, त्यामुळे पुण्यातच त्याचे इतके अवडंबर माजवण्याची गरज नाही असे यावर बहुसंख्य भाजपा पदाधिकाºयांचे मत आहे. 

Web Title: tree branches cutting due to mahajanadesh yatra in sinhgad road at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.