शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 07:59 IST

अपघातात 22 जण जखमी, वाहने चक्काचूर

कल्याणराव आवताडे, धायरी: मुंबई- बंगळुरू महामार्गावर खासगी बस व ट्रक चा भीषण अपघात झाला असून ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ रविवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमाराला घडला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,कोल्हापूरहुन मुंबईकडे  साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक व ट्रॅव्हलचे केबिन चक्काचूर झाले.  पहाटे सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहे.  अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ  पोलीस व अग्निशमन दलाचे जवानानी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. 

अग्निशमन दलाचे मदतकार्य...

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ४ अग्निशमन वाहने व १ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून १ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ७ अग्निशमन वाहने जवानांसह घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.  दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवान वरील बाजूस जाऊन रश्शीचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे पंधरा वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणारया रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. अग्निशमन दलाकडील नवले, सिंहगड, काञज, कोथरुड येथील फायरगाड्या व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए १ रेस्क्यु व्हॅन दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून विविध अग्निशमन उपकरणे स्प्रेडर, कटर, लिफ्टिंग बॅग, पहार, कटावणी, फुट पंप वापरण्यात आली आहेत. 

ट्रकच्या केबिनचा चक्काचूर

नीता ट्रॅव्हल्सची बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. 

जखमी व मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तसेच अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे