शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉमा सेंटर, हेलिपॅड धूळ खात; शासन उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:20 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी केली उभारणी

वडगाव मावळ : पुणे- href='http://www.lokmat.com/topics/mumbai/'>मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रॉमा सेंटर व हेलिपॅडची उभारणी केली. गेल्या चार वर्षांपासून ही इमारत धूळ खात आहे. याबाबत शासनाला कधी जाग येणार, असा प्र्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.मुंबई-पुणे हा ९३ किलोमीटर लांबीचा महामार्ग २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. हा मार्ग उपयुक्त आणि सोईचा असला तरी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हजारो प्रवाशांचे बळी गेले आहेत.खोपोली व कळंबोलीदरम्यान होणाºया अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कळंबोली तर किवळे ते खंडाळादरम्यानच्या अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालय असे दोनच पर्याय आहेत. परंतु या दोन्ही ठिकाणी जखमींना नेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. प्राथमिक उपचाराविना अनेक वेळा जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उभारलेल्या ट्रामा सेंटर प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अपघातातील जखमींची गैरसोय होत आहे. हस्तांतराच्या वादात हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शासनाला कधी जाग येणारगेल्या चार वर्षांपासून ही इमारत बांधून धूळ खात आहे. इमारतीला गवताचा वेढा आहे. हेलीपॅड उखडले आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सोळा वर्षांत बळींची संख्या काही हजारांवर गेली आहे. अजून किती बळी गेल्यावर हे सेंटर कार्यान्वित करण्यासाठी शासनाला जाग येईल, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघात