शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; यु ट्यूब न्यूज चॅनेलच्या नावाखाली ब्लॅकमेल करत खंडणीही मागितली, तोतया पत्रकारासह प्रमुखाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 20:33 IST

भाजी विक्रेत्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, आमच्या संघटनेची काय ताकद आहे, हे दाखवितो, अशा धमक्या देण्यात आल्या

ठळक मुद्देविक्रेता आरोपीना समजून सांगण्यासाठी गेले असता केली मारहाण

पुणे : शहरातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून यु ट्युट न्युज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली ब्लॅक मेल करणाऱ्यास हडपसर पोलिसांनीअटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षाच्या भाजी विक्रेत्याने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवप्रहार संघटनेच्या अनिल जगन्नाथ बोटे (वय ३४, रा. तुकाई टेकडी, हडपसर) याला अटक केली आहे. तर महाराष्ट्राचया प्रहार न्यूजच्या राहुल हरपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्रही सापडल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीच्या स्वप्निल धोत्रे याचा त्यांना १० सप्टेंबर रोजी फोन आला. त्याने पबला बोलवले होते. त्याच्यासोबत राहुल हरपळे व दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये गेले. तेथे अनिल बोटे हा अगोदरच आला होता. पबमध्ये फिर्यादीशी त्यातील एका मुलीने जवळीक केली. त्यानंतर तेथून सर्व जण निघाले. फिर्यादी व त्याच्याबरोबर असलेल्या मुलीने घरी जाताना रस्त्यात पावभाजी खाल्ली. त्यानंतर हे दोघेच एका लॉजवर गेले. तेथे त्यांच्यात शरीरसंबंध झाला.

त्यानंतर दोन दिवसांनी राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व एक मुलगी फिर्यादीच्या भाजीच्या दुकानावर आले. अनिल बोटे याने तू संबंधित मुलीवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरुद्ध पोलिसाकडे तक्रार देणार आहोत, जर तक्रार करायची नसेल तर ५ लाख रुपये आणून दे, अशी मागणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी अनिल बोटे याला समजाविण्यासाठी राहुल हरपळे याच्या हडपसर मेगा सेंटर येथील कार्यालयात गेले होते. तेव्हा पैसे न आणल्याने बोटे याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात खुर्ची उचलून मारली. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो व माझ्या संघटनेची काय ताकद आहे, हे दाखवितो, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन फिर्यादी घरी आले. त्यानंतर स्वप्निल धोत्रे याचा फोन करुन सांगितले की, अनिल बोटे तुझ्याविरुद्ध तक्रार करायला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला आहे. हे समजल्यावर फिर्यादी हे स्वत: लोणी काळभोर पोलिसांकडे केले. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकJournalistपत्रकार