कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ

By भाग्यश्री गिलडा | Published: December 28, 2023 02:39 PM2023-12-28T14:39:24+5:302023-12-28T14:50:53+5:30

यादरम्यान वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे...

Transport changes for Perne Jayastambha Manavandana ceremony, watch video | कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ

कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ

पुणे : कोरेगाव- भीमा शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त पुणे- अहमदनगर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ३० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते १ जानेवारी २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे - अहमदनगर महामार्ग बंद करण्यात येणार आहे. यादरम्यान वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. 

१. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
२. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड-अवजड व इतर बाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावरा- पारगाव-केडगाव चफुला- यवत- सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. 
३. पूणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर-सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला-पारगाव-न्हावरा शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील.
४. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व माल वाहतुक (ट्रक/टेम्पो इ.) ही वाहने वडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.
५. मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही बडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पावळ-शिरुर मार्गे अहमदनगर अशी जातील. 

याप्रमाणे पेरणे-कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या वाहनांसाठी हा मार्ग खुला असणार आहे, ही माहिती अशी माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

Web Title: Transport changes for Perne Jayastambha Manavandana ceremony, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.