शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पीएमपीएमएलची संचलन तूट ३५० करोडपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:15 IST

ऑडिट रिपोर्टमधून वस्तुस्थिती समोर

ठळक मुद्देसन २०१८-१९ आर्थिक वर्ष : मनपाच्या ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोरतूट कमी करण्यासाठी उपाययोजनाही सूचविल्या

पुणे : सर्वसामान्यांना इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) संचलन तूट वाढतच चालली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ही संचलन तूट ३४९ कोटी ३६ लाख एवढी असल्याचे समोर आले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही संचलन तूट ४३ कोटींने वाढली आहे.महापालिकेकडून केलेल्या ऑडिट रिपोर्टद्वारे सदर माहिती समोर आली आहे. पीएमपीएमएलचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील संचलन तूटची माहिती या रिपोर्टद्वारे मुख्य लेखापरीक्षक अंबरिश गालिंदे यांनी स्थायी समितीला सादर केली. पीएमपीएमएलने केलेल्या ऑडिट रिपोर्टमधील माहिती व अन्य स्रोतामार्फत केलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या या ऑडिट रिपोर्टमधून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सन २०१७-१८ मधील संचलन तूट ही ३०६ कोटी २९ लाख रुपये इतकी होती. यावर्षी ती ४३ कोटी ७ लाख रुपयांनी वाढली आहे. या तुटीबाबत काही कारणेही सादर केली आहेत. यामध्ये प्रति किलोमीटरमागे ६ रूपये ९३ पैशांची झालेली वाढ, त्या तुलनेत तिकीट दरात व मासिक पासमध्ये न केलेली वाढ़ गेल्या वर्षीच्या तुलनेत सन १८-१९ मध्ये पीएमपीएमएलच्या बसचा वर्षभरातील एकूण प्रवास ८५ लाख किलोमीटरने कमी झाल्याने, ४० करोड २४ लाख रुपये उत्पन्न कमी झाले, अशी दोन मुख्य कारणे सांगण्यात आली आहेत. ...........तूट कमी करण्यासाठी उपाययोजनाही सूचविल्या४दिवसेंदिवस वाढत चाललेली ही संचलन तूट कमी करण्यासाठी काही उपाय-योजनाही सूचविल्या आहेत. यामध्ये तिकीटविक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी तपासणी स्कॉड अधिक सक्षम करणे, डेड किलोमीटरचा खर्च कमी करणे, देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त असलेल्या व ७ वर्षांपेक्षा जुन्या बस कमी करणे, पुणे महापालिकेच्या जाहिरात धोरणानुसार पीएमपीएमएलची जाहिरात योजना तयार करणे, जास्तीत जास्त बस मार्गावर उतरवून मार्गस्थ करणे, पीएमपीएमएलच्या मालमत्तांचे व जागांचा वापर हा उत्पन्न्न वाढीसाठी कशा रितीने करता येईल यावर विचार करणे, बसच्या मार्गांची पुनर्रचना करणे, प्रति किलोमीटरला जास्त नुकसान देणारे मार्ग बंद करणे, देखभाल व तत्सम खर्चामध्ये बचत करणे, बाजारभावाप्रमाणे पीएमपीएलच्या मालमत्तांमधील भाडे वाढविणे, तसेच नवीन करार करणे अशा उपाययोजना या ऑडिट रिपोर्टमध्ये सुचविल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका