पुण्यात तृतीयपंथीयाचा खून : कारण अज्ञात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 20:23 IST2019-03-11T20:21:14+5:302019-03-11T20:23:44+5:30

महंमदवाडी येथे सदाशिव नगर परिसरात हांडेवाडी रोडवर पिंपळे इमारतीतील फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

transgender murder at Pune | पुण्यात तृतीयपंथीयाचा खून : कारण अज्ञात 

पुण्यात तृतीयपंथीयाचा खून : कारण अज्ञात 

हडपसर : महंमदवाडी येथे सदाशिव नगर परिसरात हांडेवाडी रोडवर पिंपळे इमारतीतील फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  .


          अरबाज शेख असे खून झालेल्या तृतीयपंथी नागरीकाचे नाव आहे. महमदवाडी परिसरातील हांडेवाडी रस्त्यावर सदाशिवनगर आहे. येथील एका सोसायटीमध्ये शेख राहात होता.सोमवारी सकाळी त्याच्या घरी शेखचा गळा चिरलेल्या अवस्थतील मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णलयात पाठविला.अधिक तपस वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.

Web Title: transgender murder at Pune